महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनेक खाद्य प्रकारांचा वारसा लाभलेला आहे .मग त्यात कोकण, घाटी, विदर्भ, मध्य , उत्तर , दक्षिण असे अनेक नानापरी तोडीस तोड देणारे पदार्थ केले जातात .त्यात पारंपारिक पद्धती वापरुन केलेले पदार्थ आजही सातासमुद्रापार लोकप्रिय झालेले आज पहायला मिळत . असाच एक भाग खान्देश .नाव वाचल्याबरोबर आठवतो त्यातला काळा झणझणीत मसाला आणि त्यापासून बनवलेले पदार्थ .मग त्यात रशी- पातोडे , खान्देशी भरीत ,दाल-बट्टी, डुबुक-वड्या , वडारस्सा , मिसळ , गोळाभात अशी कितीतरी नाव घेता येतील .अगदी वशाटाच्या तोडीस तोड देणारी ही जेवण पद्धती . आज त्यातलाच एक प्रकार म्हणजे खान्देशी खिचडी मी केलीय . बघा कधी जमली तर नक्की करुन पहा
खान्देशी खिचडी
साहित्य
२ वाटी तांदूळ (आम्ही इंद्रायणी घेतला ,तसा कोणताही चालतो )
१ वाटी डाळी (मूग , हरभरा ,तूर , मसूर, मटकी मिक्स )
कांदा १
टोमॅटो १
बटाटा १
इतर काही भाज्या आवडीनुसार मी वांगे , फरसबी , फ्लॉवर , वटाणा घेतला , शिमला मिरची पण चालते .
लसुन १०-१२ कळ्या ,
१" आल
कढीपत्ता १-२ काड्या ,
फोडणीसाठी जीरे ,मोहरी
अर्धी वाटी तेल
मसाले : लाल तिखट ,हळद , खान्देशी मसाला
स्पेशल वाळवलेला उभा चिरलेला कांदा
कोथींबीर
खोबऱ्याचे पातळ काप
काजू शेंगदाणे (दोन्ही भिजवा २० मिनी, ऐच्छिक आहे )
कृती:
१). सर्वप्रथम कुकरमध्ये तेल सढळ हाताने घाला व ते गरम करुन त्यात जिरे ,मोहरी,कढीपत्ता घालून तडकवा .
२)आता त्यात लसूण व आलं घालून थोडावेळ परतवा .
२ .आता कापलेला कांदा पारदर्शक होईस्तोवर परतवा त्यात शेंगदाणे व खोबऱ्याचे काप /काजू , मग एकएक भाजी घाला .
३. मग गॅस मंद करुन त्यात सारे मसाले एक एक करुन घाला .बुडाला लागणार नाहीत याची काळजी घ्या .
४.त्यात मीठ व स्वच्छ धुतलेले तांदूळ - डाळ घालून चागंले परतवा. तांदूळ सर्व बाजूने तेलात परतले गेले पाहिजे. आता त्यात पुरेसे पाणी घालून एक उकळी येऊ द्या . मगच झाकण लावून ३ शिट्या होऊ द्या .कुकर थंड झाला की मस्तपैकी ताट सजवा. त्यासाठी वाळवलेला कांदा थेंबभर तेल तव्यावर घालून भाजा आणि तो वापरा .वर कोथंबीर फिरवा. फोटो काढून समूहावर पोस्ट करा .🙏🏻
कु.सागर महाजन
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment