Saturday, August 25, 2018

गव्हाची बिस्किटे

खरं तर एखाद्याला बुडवणे हा माझा स्वभाव नाही😅...पण चहामध्ये बिस्किट्स बुडवणे हा गुन्हा मी रोज करते😄(भले पेशंट्सना बिस्किट्स न खाण्याच्या सल्ला देते... पण हे पथ्य मी मात्र पाळत नाही😛).मग त्यातल्या त्यात हेल्दी ऑप्शन्स शोधत असते. मग यावेळी घरीच प्रयोग करायचा ठरवले. मग मैद्या पेक्षा गव्हाचे पीठ ...ते ही न चाळता... कधीही चांगलेच... सोबत आईने पाठवलेले साजूक तूप...प्रयोग यशस्वी झाला.
मी केलेले हे बिस्किट्स गोडीला अगदीच कमी आहेत. तुम्ही हवेतर साखर थोडी जास्त घालू शकता. खूप सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे ही!नक्की करून कळवा. 

गव्हाची बिस्किटे

साहित्य :
साजूक तूप : ६० ग्राम्स
पीठीसाखर : ४० ग्राम्स
बेकिंग पावडर :१/४ चमचा
गव्हाचे पीठ 

कृती:

एका पसरट थाळीत तूप घेऊन चांगले १५ मिनिटे फेटावे. अगदी पांढरे शुभ्र आणि हलके झाले पाहिजे. जेवढे फेटाल तेवढी बिस्किटे हलके होतील. नंतर त्यामधे बेकिंग पावडर चांगली मिक्स करावी. नंतर या मिश्रणात हळूहळू गव्हाचे पीठ मिसळावे. घट्ट गोळा बनवावा. आवश्यक वाटल्यास किंचित पाणी घालावे. नंतर हलक्या हाताने याचे लिंबाच्या आकाराचे गोळे वळावेत व हलके दाबून चपटे करावेत.
बेकींग ट्रेमधे ठेवून १२-१४ मिनिटे बेक करावेत.

डॉ. अस्मिता भस्मे.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment