🔷मेथी मला अशी आवडते🔷
साहित्य:
निळसर पानांच्या कडा असलेली मेथी. जरा ठुस्की;एरंडासारखी वाढलेली नव्हे .
निवडून घेतली की पाण्यात मीठ टाकून दोनदा धुऊन घेतो.निथळायला ठेऊन हिरवी मिरचीचे तुकडे ( यामुळे चव वाढते ) किंवा ठेचा ,लसूण, जिरे ,मोहरी ,शेंगदाण्याचे भरड कूट किंवा मूग किंवा मठाची भिजलेली डाळ
कृती:
१.लोखंडी तवा किंवा कढईत तेल तीनेक चमचे तेल जिरे मोहरी व जरासा जास्त लसूण मिरचीचे तुकडे टाकून फोडणी दिल्यानंतर भाजी फोडणीत टाकणे.
२.झाकण ठेवून वाफलून घेतल्यानंतर शेंगदाण्याचे कूट टाकून मीठाच्या सुटलेल्या पाण्यात भाजी अधूनमधून हलवत शिजवून घेणे.
३.यात शिजायला पाणी टाकले तर भाजी कडवट होते.
( शेंगदाणे कूट नसेल तर भिजलेली डाळ टाकून शिजवावी ;कूट वर्ज्य करावे )
**याची पातळ भाजी पण छान लागते .फक्त पाणी न टाकता मिक्सरमध्ये बारीक करून चांगली परतून घ्यावी .
काकासाहेब वाळुंजकर
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment