🔷काकडीची पचडी🔷
साहित्य
काकडी,शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ
कृती
काकडी बारीक कोचून घ्यावी. त्यात ओबडधोबड कुटलेले शेंगदाणे, बारीक चिरलेली मिरची,बारीक चिरलेली कोथिंबीर ,मीठ घालून चांगले एकत्र करावे. पचडी तयार. यातच दही आणि साखर घातले की कोशिंबीर तयार होते.
अस्मिता भस्मे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷कोबीची पचडी🔷
कोबी बारीक चिरून किंवा खिसून घ्यावा त्यात मीठ साखर घालावी व वरुन तूप हींग जिर मोहरी ची फोडणी घालावी बारीक चिरून कोथिम्बीर घालावी हवे असल्यास शेंगदाना कूट घालावे
अंब्याचे रायते
कैरी उकडून गर काढून घ्यावा त्यात कांदा बारीक चिरून गूळ मीठ तिखट घालावे
ममता संसारे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
गाजर ,बिट कोशिम्बिर
दोन्ही किसावे .त्यात दही ,दाणेकूट ,कोथिमबिर ,मिरची ,मीठ ,चवीला साखर घालावी .
वैशाली मोरजकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
कैरी कांदा कोशिंबीर .....कांदा कैरी चिरुन घेऊन गुळ मीठ टाकून ठेवावे नं तर वरुन फोडणी करून घालावी तेल राई जीर हिंग हळद तिखट घालावे.
अनघा भिडे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷मेथीची पचडी🔷
१जुडी कोवळी मेथी
१कांदा
२चमचे दाण्याचे कुट
मीठ व साखर चविनुसार
१ हिरवी मिरची
लिंबू
फोडणी
मेथी व कांदा बारीक चिरवा त्यात दाण्याचेकुट मीठ साखर घालावी हिरव्या मिर्चीची फोडणी घालावी लिंबू पिळून कालवावी
याला मेथिचा खुडा असेही म्हणतात
अंजली जोशी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
मुळ्याच्या पानाची पछडी कोवळ्या मुळ्याची पाने धुऊन बारीक चिरणे जरा हाताने कुस्करणे त्या मध्य मीठ साखर घालून लींबु पिळणे चवी पुरती साखर घालणे पाहिजे असेल तर ओल खोबर घालणे आंबट तुरट पछडी छान लागते
वैशाली हेगिष्टे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
मेथीची पचडी
१जुडी कोवळी मेथी
१कांदा
२चमचे दाण्याचे कुट
मीठ व साखर चविनुसार
१ हिरवी मिरची
लिंबू
फोडणी
मेथी व कांदा बारीक चिरवा त्यात दाण्याचेकुट मीठ साखर घालावी हिरव्या मिर्चीची फोडणी घालावी लिंबू पिळून कालवावी
याला मेथिचा खुडा असेही म्हणतात
अनघा भिडे
धन्यवाद
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment