गुळाचा सांजा
१ वाटी रवा
पाऊण वाटी किंवा आपल्या आवडीनुसार गूळ
१ वाटी पाणी + १ वाटी दूध
१/२ वाटी तुप
वेलची पूड
- रवा तुपावर खमंग भाजणे. एक चमचा तूप ठेवणे. एकीकडे पाणी व दूध गरम करायला ठेवणे. रवा भाजला की त्यात पाणीदूध घालून चांगली वाफ आणावी. वाफ आल्यावर बारीक केलेला गुळ घालणे. गुळ विरघळला की वेलचीपूड घालून तूप सोडणे.-
गीतांजली देगावकर
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment