सांबार
साहित्य
तूर डाळ १/२ वाटी, १वांगे ,१बटाटा,१टोमॉटो,१कांदा,१गाजर,४ घेवड्याच्या शेंगा,२हिरव्या मिरच्या, १शेवग्याची शेंग.
कृती
वरील सर्व भाज्या ...(ज्या उपलब्ध असतील त्या) चिरून घ्या. डाळी सोबतच १/२च.हळद,१/४ चमचा हिंग, लिंबाएवढी चिंच व सर्व भाज्या,२चमचे तेल,१/४चमचा मेथीदाणे कूकरला शिजवून घ्यावे. नंतर मोहरी, जिरे, हळद, हिंग, कढीपत्ता, लसूण, सुक्क्या मिरच्यांची फोडणी करावी.त्यात कूकरमधे शिजवलेले सगळे टाकावे. चमचा धणेपूड, १/२ चमचा जीरेपूड, १चमचा लाल तिखट, १चमचा सांबार पावडर, थोडासा गूळ, मीठ व लागेल तेवढे पाणी घालून चांगले उकळावे. वरून कोथिंबीर घालावी.
अस्मिता भस्मे
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment