Saturday, July 28, 2018

भरीत चे प्रकार

🔷भोपळ्याचे भरीत

भोपला फोडि चाळणीवर ठेऊन वाफवाव्या .मऊ करून त्यात बारीक चिरून कांदा .कोथिमबीर मीठ ,दही घालून कालवावे .

🔷काजूच्या बोन्डाचे भरीत

रसरशीत बोण्दे चुलीत .भाजावी .साल काढून चुरावी .बारीक चिरलेला कांदा ,दही ,मीठ .मिरची ,कोथिम्बिर घालून काल्वावे .वास 👌

वैशाली मोजरकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷लाल भोपळ्याचे भरीत.

लाल भोपळ्याच्या फोडी शिजवून घ्याव्यात.  गार झाल्यावर त्यात दाण्याचं कूट, साखर, मीठ व दही घालून वरून तूपजीर्याची फोडणी द्यावी. नारळ कोथिंबीर घालावी.

नीता गोखले.
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷टमाट्याचं भरीत

साहित्य:

३ लाल मध्यम टमाटे, १ मध्यम कांदा, एखाद दुसरी लहानशी मिर्ची तिखटपणा व आवडीनुसार कमी-जास्त, थोडीशी कोथिंबीर, ३-४लसूण पाकळ्या, जिरं, मीठ, कच्चं शेंगदाण्याचं तेल.

पाककृती

टमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा. टमाट्याची साल सुटायला आली की, गॅस बंद करा. दरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. जिरं भाजून जाड कुटून घ्या. सोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. चव पाहून मीठ घालून मिक्स करा. वरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता. वरून थोडी कोथिंबीर डाला. चटपटीत टमाट्याचं भरीत तयार आहे तुमच्यासमोर...

गौरी घाटगे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷लाल भोपळ्याचे भरीत.

लाल भोपळ्याच्या फोडी शिजवून घ्याव्यात.  गार झाल्यावर त्यात दाण्याचं कूट, साखर, मीठ व दही घालून वरून तूपजीर्याची फोडणी द्यावी. नारळ कोथिंबीर घालावी.

लाल भोपळ्याच्या फोडी शिजवून घ्याव्यात.  गार झाल्यावर त्यात दाण्याचं कूट, साखर, मीठ व दही घालून वरून तूपजीर्याची फोडणी द्यावी. नारळ कोथिंबीर घालावी.

नीता गोखले

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment