Monday, July 30, 2018

वालाच्या भाज्या

वालाची भाजी

वालाचे दाणे किंवा कोवळ्या शेंगा लहान तुजडे करून खुडून घायव्यात, शेंगांच्या शिरा गवारीच्या शिरा काढतो ताशा काढायच्या. ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या घेऊन जिरे आणि लसणाची फोडणी द्यावी, त्याचे लाल तिखट  चवीप्रमाणे घालून खमंग वास सुटला की वालाच्या शेंगा धुवून तेलात १ मिनिट परतायचे.थोडे पाणी घालून वाफेवर शिजू द्यायच्या.
अर्धवट शिजल्या की त्यात खोबऱ्याचा चव घालतो तेवढंच दाण्याचं कूट घालावं.मीठ घालून भाजी पूर्ण शिजवावी. वर कोथिंबीर बारीक चिरून पेरावी.ही भाजी सुकी किंवा रशाची करता येते

शिल्पा कापुरे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

डाळींब्या[वाल]

फोडणी केल्यावर डाळींब्या;बारीक मेथि[वाळु वरची];टाॕमेटो[एक छोटा];एक कांदा[छोटा];चिरुन टाकणे
म.--बारीक मेथी शिजवून पाणि काढून टाकून फोडणित टाकणे कडवटपणा जातो.थोडा गूळ डाळिब्या थोड्या कडवट असतात म्हणून घालणे.ओल खोबर रस भाजी तयार

वाल

वालाच्या शेंगा सोलून दाणे काढून;गाजर;टाॕमेटो;वांग;बटाटा;शेगट्याचि शेंग;संकूरात असेल तर कच्चि दोन-चार बोर तिळकूट थोड ओलखौबर कोथींबीर गोडा मसाला थोड गूळ तिखट मिठ चवीनुसार
पंचामृती सरखी भाजी संक्रातिला कोकणात करतात

डाळिंब्या आमटी

डाळीब्या किंवा डाळींंब्याचि डाळ कुकरला शिजवून घेणे
मग सूख खोबर जिर भाजून घेणे फोडणी नेहमी सारखी करुन शिजवलेले डाळिंब्या किंवा डाळिःब्या डाळ फोडणित घालून त्यात तयार वाटण घालून पाणि बर्यापैकी घालणे चिंचेचा कोळ गूळ घालणे चवीनुसार मिठ घालणे
हि आमटी काळ्यारंगाचीहोते

रुचिरा जोशी

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment