बुंदी रायता
एक वाटी दही पाणी न घालता घुसळून घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ, साखर व बारीक चिरलेली कोथिंबीर , मिरची पावडर एकजीव करून घ्यावे. त्यात अर्धी वाटी खारी बुंदी घालून एकत्र करावे
मंगला डोंगरे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
मुळ्याचे रायते
मुळा किसुन घ्यावा, त्यात गोड दहि, चवीपुरती साखर, सैधव मीठ कोथिंबीर बारीक चिरुन घालावी, राई, कढीपत्ता फोडणी करुन घालावी, फोडणी त थोडिशी मिरची पावडर घालावी.
वंदना मंकिटर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
दही पाणी न् घालता फेटूंन् घेणे मीठ किंचित साखर घालणे वरुन तूप हींग जिर मोहरी सुखी लाल मिर्चिची फोडणी देणे दही रायता तयार.
ममता संसारे
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment