आंबिल
साहित्य
दोन चमचे ज्वारीच पिठ,एक ग्लास आंबट ताक ,आल,लसूण,कोथिंबीर,जीरे,मीठ,पाणी.
कृती
अर्धा ग्लास पाण्यात दोन चमचे ज्वारीचे पिठ व्यवस्थित मिसळून शिजवायला ठेवावे.दोन उकळ्या काढून थंड करायला ठेवावे.थंड झाल्यावर ताक,आल,लसूण,कोथिंबिर,जिरे ,मिठ बारीक वाटून मिसळावे.त्यात दोन ग्लास पाणी घालावे.फ्रीजमध्ये थंड करून प्यावे.
●गावाकडे छोट्या बिंदगीत ठेवून धान्याची रास करताना आडोश्याला ठेवून वरचेवर पितात.
सौ.वैशाली पाटील
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment