🔷दडपे पोहे
साहित्य
पातळ पोहे,कांदे, टोमॅटो, खवलेला नारळ, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर , शेंगदाणे, पापड, फोडणीचे साहित्य
कृती
पोह्यांवर नारळाचे पाणी शिंपडून कांदा टोमॅटो चिरे पर्यंत झाकून ठेवावे.कांदा टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्य. खवलेला नारळ कांदा टोमॅटो कोथिंबीर चवीनुसार मीठ साखर पोह्यांवर घालून चांगले मिक्स करावे. दाणे तळून घ्यावे. नंतर फोडणी घालावी. खायला देताना उडीद पापड तळून चुरून घालावा.काही जण पोह्याचा पापड तळून घालतात
वृषाली देशपांडे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷कोळाचे पोहे
साहित्य
२वाट्या जाड पोहे, एका नारळाचं दूध(आधी काढलेल घट्ट दूध व दुसऱ्यांदा काढलेल पातळ दूध वेगवेगळं ठेवाव) १ चमचा चिंचेचा कोळ, मिरच्या,कोथिंबीर, मिठ, साखर,तुप, हिंग , जिरे आणि पाहिजे आसल्यास कढीपत्ता
कृती
पोहे धुवून निथळून घ्यावे ,नारळाच्या दुसर्यांदा काढलेल्या दुधात पोहे भिजवावेत,5-10 मिनिटआनी त्यात थोड नारळाचं दूध ,चिंचेचा कोळ,मीठ,साखर घालावी । नंतर तुपात हिंग जिरे मिरचीचे तुकडे कढीपत्त्य घातलेली खमंग फोडणी करून पोह्यांवर घालावी । कोथिंबीर घालावी अगदी खायच्या वेळेला पोहे कोरडे वाटले तर ललागेल तस उरलेल नारळाचं दूध घालून पोहे चांगले ढवळून घ्यावेत
रेश्मा
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷दडपे पोहे : २
जाड पोहे, कांदे, खवलेला नारळ मीठ साखर कोथिंबीर
पोह्यांवर नारळाचे पाणी शिंपडून झाकून ठेवावे
कांदा कोथिंबीर बारीक
चिरून पोह्यांमधे घालून चवीनुसार मीठ साखर घालून खायला द्या
वृषाली देशपांडे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷पोहे दडपून ठेवायचे म्हणजे पोहे आवळ तोंडाच्या भांड्यात गच्च भरून त्यावर वजन ठेवून ते दडपायचे. तळलेल्या भरली मिरचीची फोडणी पण छान लागते
अर्चना चव्हाण
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷साय ग्रेव्ही म्हणून पण वापरू शकता. एखाद्या भाजीत कांदा लसूण खोबरे आलं तेलात परतायचं.. तिखट टाकायचे आणि साय टाकायची. छान ग्रेव्ही तयार होते...पण साय टाकल्यामुळे तिखट कमी होते..ते आपल्या चवीप्रमाणे करायचे..आणि तेलकट पण दिसते.
गौरी घाटगे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment