Saturday, July 28, 2018

विविध चटण्या

🔷कांदा आणि कैरी चटणी

२ कांदे १कैरी जिरे गूळ मिरची पावडर कोथिंबीर चवीनुसार मीठ

कांदा आणि कैरीच्या फोडी करून घ्याव्या. त्यात गूळ जिरे मिरची पावडर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून mixer ला लावून बारीक करावे. चटकदार चटणी तयार....

- निता दोशी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷नारळाची चटणी

ओला नारळ चव १वाटी
७-८ कडीपत्त्याची पाने
कोथिंबीर पाव वाटी
२-४हिरव्या मिरच्या
1चहाचा चमचा जिरे
थोडा हिंग
चवीनुसार मीठ व साखर
लिंबाचा रस .हे सर्व मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.झाली झटपट नारळाची चटणी तय्यार.

रूपाली केदारी.
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷भेंडीची चटणी

भेंडी चिरल्या नंतर  वरची जी बुच आपण टाकून देतो ती  न टाकता कढईत चांगली परतुन घेणे  गारझाल्या नंतर त्या मध्ये ओली मीरची, थोडी चिंच चवी पुरते मीठ  साखर, आणि पाहिजे असल्यास ओल खोबर  कथिबिंर टाकून मीक्सरला लावणे टाकाऊ पदार्थ पासून चटणी मस्त लागते

वैशाली हेगिष्टे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷कढीपत्ता कोरडी चटणी

साहित्य

कढीपत्त्याची पाने 100 ग्रॅम
डाळ्या 50 ग्रॅम
चिंच दोन बोटं
काळी मिरी 7ते8 दाणे
मीठ चवीनुसार

कृती

कढीपत्ता, डाळ्या, मिरी आणि चिंच सोनेरी रंगावर भाजून घ्यावे
सर्व मिश्रण मिक्सर मध्ये वाटून बारीक पावडर करावी. चविनुसार मीठ घालावे.
 
ही चटणी गरम तूप व भातासोबत छान लावते, इडली किंवा डोस सोबत पण खाऊ शकतो

शिल्पा कापुरे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷आवळा चटणी

येक वाटी आवले ,पुदिना ,ओल खोबरे ,,मिरच्या ,मीठ ,साखर
आवल्याच्या बिया काढून चटनी वाटावी .तेलाची हिंग ,मोहरीची फोडणी ध्यावी

वैशाली मोरजकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷कैरीची चटणी

कैरीचीसाल काढून मध्यम आकाराच्या फोडी करणे पाणी उकळून त्या मध्ये पाच मिनिटे शिजवून घेणे
पाणी काढून टाकणे साखरेचा दोन तारी पाकामध्ये घालून शिजवणे.शिकताना त्या मध्ये चवी प्रमाणे जिरेपुड.धनेपुड.मिरचीपुड .मीठ घालून मधा इतपत घट्टपणा आला की गॅस बंद करणे

🔷कांदा कैरी

कांदा लांब चिरून घेणे कैरी खिसुण एकत्र करून मीठ घालावे तेलामध्ये जिरेमोहरी.तिखट.चिमट भरसाखर घालुन एकत्र करणे

🔷लसुण चटणी

१०-१२ लसुण पाकळ्या.जिरे.लालतिखट.मीठ.एकत्र करून थोडे पाणी घालून मिक्सरला बारीक करणे.दाबेली.सॅडविच.भेळ मध्ये वापरता येते

मीना खामकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷पिकलेले कवठ

त्याच्या बिया सकट गर, गूळ,तिखट,मीठ,जिरे,मिक्सर मध्ये एकत्र वाटणे.
आंबट.. गोड कवठाची चटणी तयार....
अंजली जोशी

🔷दोडक्याच्या सालीची चटणी

तेलात साली परतावून घ्या .नंतर त्यात लाल मिरची ,तीळ ,खोबरे घालून पड़ता .खाली उतरून चिंच ,गूळ ,मीठ घालून चटणी वाटा

वैशाली मोरजकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷कांदा अणि कैरीची चटणी....

साहित्य

१ कैरी १कांदा जिरे गूळ कोथिंबीर मिरची पावडर हिंग अणि चवीनुसार मीठ

कृती

कैरीची साल काढून चौकोनी तुकडे करून घ्यावेत कांद्याच्या पण फोडी करून घ्याव्या त्यात वरील सगळे साहित्य टाकून mixer la लाऊन एकदम बारीक करून घ्या... चटकदार चटणी तयार..

.. सौ निता दोशी..

खजूरचटणी..भेळेची

भिजवलेला खजूर,...बिया काढून, (सॉफ्ट काळा खजूर preferred  ) गूळ,चिंचेचा कोळ,
मिक्सर मधन काढावे,
लहान भांड्यात काढून गॅस वर उकळत  ठेवावे
त्यात मीठ,तिखट, चांट मसाला,जिरे पावडर,घालावी  एक उकळी काढावी.
आवडीनुसार पातळ करावे अथवा जाड ठेवावे.
टिकाऊ असते.

अंजली जोशी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷काळ्या तिळाची चटणी

काळे तिळ
मिरची
मीठ काळे तिळ खमंग भाजुन घेणे व त्यात बाकी सामान घालुन मिक्सरला लावणे
अशीच जवसाची चटणी पण करतात

🔷ओल्या नारळ चटणी

ओल खोबर
भाजकी चणा डाळ
कांदा
ओली मिरची
कढी पत्ता
कोथिम्बीर
जिर
मीठ
साखर सर्व एकत्र करुन मिक्सरला लावणे लिम्बु रस घालणे हवी असल्यास वरुन तुपाची सुखी मिरची मोहरी जिर हींग कढी पत्ता ची फोडणी देणे

ममता संसारे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷मिश्र चटणी

खोबरे ,तीळ  दाळया , दाणे ...2चमचे घेऊन  वेगळे वेगळे  भाजावे  मग मिकसरला लावुन  मिरची  कोथिंबीर  आल  लसुण  पाणी  घालून  बारीक  वाटायचं  आणि वरून लाल मिरचीचा तडका दयावा.

अंजली अतुल जोशी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷भोपल्याच्या साली बारीक चिरून त्यात मीठ मिरची थोड़ा गूल जीर चिंचेच बुटूक हे सर्व पाट्यावर बारीक वाटायचे

ज्योती खांबेटे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷टोमेटो चटणी

१ टोमेटो देठाचा भाग काढून
१/२ वाटी कच्चे शेंगदाणे
३ लसूण पाकळ्या
थोडी कोथिंबीर, कढिपत्ता, मीठ, साखर चवीप्रमाणे घेणे.
सर्व जिन्नस एकत्र वाटून घेणे, पाणी घालू नये, ब्रेड, चपातीला लावून रोल किंवा सँडविच करुन खाणे.

दीपाली बोधे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷टोमॅटो चटणी

टोमॅटो बारीक चिरून
कांदा बारीक चिरून
आले लसुन पेस्ट
शेंगदाणा कूट
तिखट हळद
मीठ साखर

एका कढाईत तेल घालुन गरम झाले की त्यात हींग जिर मोहरी फोडणी द्यावी त्यावर कांदा घालुन चांगले परतावे नंतर त्यावर टोमॅटो घालावा चांगला परतावे नंतर त्यावर हळद तिखट मीठ साखर घालुन परतावे व शेंगदाना कूट घालावे एक कढ़ घालुन ग्यास बंद करावा ही चटणी ८ दिवस टिकते

ममता संसारे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷शेंगाची चटणी त्यात दही घालून ,कोथींबीर, कांदा बारीक चिरून त्याला मेथ्याची मिरची ची फोडणी द्यावी

वैजयंती जोशी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷कोकम चटणी

१वाटी कोकम ३/४लसूण पाकल्या १चमचा जीर सुक खोबर १च मसाला किंवा लाल मिरची मीठ गुल सर्व साहित्य मिक्सरला लावणे चटणी तयार कोथिंबीर पुदीना पण घालू शकता पित्ताला ही चटणी फारच छान

विद्या शेट्ये
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷पुदिना चटणी

पुदिनापाने एक वाटी, कोथिंबीर अर्धी वाटी, एक मिरची, चार लसूण पाकळ्या, ओले खोबर्‍याचा चवदोन चमचे, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ  व साखर सर्व एकत्र मिक्सरमध्ये फिरवुन घेणे.

मंगला डोंगरे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷ओल्या दाण्यांची चटणी

साहित्य

भुईमुगाच्या शेंगा सोलुन काढलेले दाणे 2 वाटी
लसूण १आख्खा
लाल तिखट ४ लहान चमचे अथवा चवीनुसार
मीठ
कोथिंबीर १/२ वाटी

ओले दाणे थोडे भाजून घ्यावेत, कोथिंबीर बारीक चिरून सर्व साहित्य एकत्र मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून एकत्र करावे,

पराठ्यासोबत किंवा भाकरी सोबत खायला चटकदार चटणी तयार

शिल्पा कापुरे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷लसुण ची चटणी

लसूण पाकळ्या ,तिखट ,मीठ,
जिरा पावडर ,सांभार हे साहित्य मिक्सर मध्ये वाटून घेणे त्यावर सरसो तेल चा तडका मोहरी टाकून देने पण थोडं थंड झाल्यावर . स्ट्रॉंग वाटते पण छान लागते

निशा
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷ओला  मटारची  चटणी

एक  वाटी मटार
ओले  खोबरे अर्धी वाटी 
कोथिंबीर   धुऊन   बारीक   चिरून अर्धी  वाटी 
लिंबू रस  एक   चमचा 
चवीनुसार  मीठ
साखर आवडीप्रमाणे किंवा   दोन   चिमूटभर  
आद्रक  एक  छोटासा   तुकडा   वरची साल  काढून  आणि   तिखट   खाणारे  त्यांनी   हिरव्या  मिरच्या   त्यांच्या   आवडीप्रमाणे   घालावी   ..कारण   मी  हिरव्या   मिरच्या   न  घालताच  हि  चटणी   करत  असते

कृती 

वरील   सर्व  जिन्नस   एकत्र   करून   मिक्सर  मधे  घाला  व  अंदाजाने   पाणी   घालून  मिक्सरवर  बारीक   करून   घ्यावे   ..एका   बाऊलमधे  चटणी   काढा  .नंतर बारीक   मोहरी (राई) मिळते.  एक   चमचा  तेलाची   फोडणीत  फक्त   मोहरी   चिमूटभर   घाला   चांगली  तडतडली  कि  त्या  चटणीवर  घालून   मिक्स  करा  .चटणी   तयार.

सौ.सुनंदा  शिंदे .
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷 मुळ्याची चटणी

कोवळा मुळा धुवून सोलून तुकडे करून घेणे,
पांने देठा चा जाड भाग काढून टाकून चिरून घेणे लसूणपाकळ्या,हिरवी मरची मीठ , कोथिंबीर हे सगळं मिक्सर मधून किंचित जाडसर वाटणे,आणि वरून लिंबू पिळून घेणे.अशीच नुसत्या मुळ्याची ....पाने न घालता ही करतात.

अंजली जोशी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷कैरीची टिकाऊ चटणी

कैरीच्या फोडी १ वाटी ४ हिरव्या मिरच्या कोथिंबीर १वाटी दाण्याचे कूट १/२ वाटी चिरलेला गूळ पाव वाटी मीठ जिरे सर्व एकत्र मिसळून मिक्सरला बारीक वाटावे चटकदार चटणी तयार ही चटणी ६ ७ दिवस रहाते.

डॉ.अर्चना चव्हाण

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment