Tuesday, July 24, 2018

ज्वारीची गंजी

🔷ज्वारीची गंजी🔷

ग्लासभर पाण्यात दोन चमचे ज्वारीचे पिठ मिक्स करावे.एक कुडी लसूण,मीठ,पाव छोटा चमचा जिरे,थोडीशी कोथिंबिर बारीक वाटून घेवून वरील मिश्रणात टाकावी.एक ते दोन उकळी काढून तूप टाकून किंवा असेच प्यावे.
खमंग लागते--तोंडाला चव येते.
हे थंड/गरम दोन्ही छान लागते.
*तुप फक्त गरम असताना टाकावे.

वैशाली पाटील
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

नाचणी आंबील

नाचणी  पीठ   2 चमचे+,.पाणी  १ग्लास +मीठ  चवी  नुसार   हे  सर्व   एकत्र  करून   उकळून   घेतले ..नंतर   ताकाला   हिंगाची  फोडणी    जिरेपूड    आणि    कोथींबीर    धुवून  खूपच       बारीक   चिरुन     घालावी ..ह्या ला  आंबील  म्हणतात ..( ह्यात हिरव्या  मीरच्या  बारीक   चिरून   घालतात   पण  मी  नाही   घातल्या ). आता  ऊन्हाळ्या त   हे  आंबील  करण्याची   पध्दत   आहे..  .

सुनंदा

धन्यवाद

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment