🔷सांडगे
(कारण हे सांडगे थंडीत मुबलक मिळणाऱ्या भाज्यांचे/फळांचे/फळभाज्यांचे आहेत.)
साहित्य : कच्ची हिरवी पपई,गाजर,मुळा,मेथी, हिरवी कांद्याची पात, कोथिंबीर, तीळ,ओवा, हिरवी मिरची, आलं, लसूण,मीठ, हिंग,हळद,धण्याची भरड.
कृती
पपई,गाजर,मुळा किसणीने बारीक किसून घ्यावे.
* मेथी, कोथिंबीर,पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी.
* मिरची, आलं, लसूण ओबडधोबड वाटून घ्यावे.
* वरील सर्व जिन्नस एकत्र करुन त्यात वाटण,तीळ,ओवा, धणे,हिंग, मीठ व्यवस्थित मिसळून घ्यावे.
* हाताला किंचित तेल लावून बत्ताशा एवढ्या आकाराचे मध्यम जाडीचे सांडगे हातावर थापावेत.
* उन्हात छान दोन्ही बाजूंनी वाळवून घ्यावेत.
हे सांडगे तव्यावर थोड्या तेलावर तळून घेतात.
कढी सोबत, मुगाच्या खिचडी सोबत मस्त तोंडीलावणे...
आठवण झाली...😋😋
🔷 हनी-सेसमे ड्रेसड् सलाड
(कालच्या potluck ला ट्राय केले होते... मस्त झाल होत)
साहित्य : लेट्यूस ची पाने,चेरी टोमॅटो, कोबी,कांदा,पिवळी-लाल-हिरवी शिमला मिरची, काकडी,वाफावलेले corns, पनीरचे छोटे चौकोनी तुकडे, लिंबू रस,मध, भाजलेले पांढरे तीळ,चिली फ्लेक्स,ओरीग्एनो/मिक्सड हर्बज्,मिरे पूड,औलीव्ह तेल, मीठ
कृती
प्रथम २-३ चमचे तेलात तीळ, चिली फ्लेक्स, हर्बज्,मिरे पूड,मीठ, लिंबू रस,२ चमचे मध छान व्हीस्क करून सलाडसाठी ड्रेसिंग बनवून घ्यावे.
* पनीरचे तुकडे १० मिनीटे कोमट पाण्यात बुडवून ठे्वावेत.
* बारीक चिरलेली लेट्यूस ची पाने,शिमला मिरची, कांदा-कोबीच्या जुलीयनस्, टोमॅटो,corns एकत्र करावेत.
*पनीर दोन तळहातांमधे दाबून जास्तीचं पाणी काढून टाकावे आणि सलाड मधे मिक्स करावे.
*तयार ड्रेसिंग सलाड मधे मिक्स करून,सलाड toss करून घ्यावे.
* आवडत असल्यास यात पनीर ऐवजी उकडलेले अंडे देखील ट्राय करता येईल (ही काल मैत्रिणीकडून मिळालेली टीप).
कसं वाटलं सांगाल..
🔷व्हेज पफ्
इकडे ब्रिटनमध्ये "नेमीची येतो पावसाळा" असा अनुभव आहे..
झालाही सवयीचा आता... तद्पश्चात जिव्हेला आवडणार अन् आरोग्यदायी असे पदार्थ सुरू असतात माजघरात...
त्यातलाच हा प्रयत्न..😊
कधीही मदतीला तत्पर असलेल्या उकडलेल्या बटाटयांऐवजी यावेळी धावुन आली सकाळची शिल्लक मसूर डाळ घालून केलेली दुधी भोपळ्याची भाजी..
अर्थात अस्मादिकांना बटाट्याचा च पर्याय उत्तम..!
(इथे बटाट्याचीच पाक्रु देतीये)
साहित्य
उकडलेले बटाटे,वाफवलेले मटार, किसलेले गाजर, कांदा,आल-लसूण पेस्ट, कोथिंबीर,हळद,लाल तिखट, थोडेसे भरडलेले धणे, जिरे पूड, आमचूर पावडर,मीठ, साखर, लिंबू रस आणि रेडीमेड पफ् पेस्ट्री शीटस्.
(घरीही या शीटस् तयार करता येतात... मेहनत आहे, पण या रेडीमेड शीट्स ने ही सेमचं रिझल्ट मिळाला.)
कृती
तेल गरम झाले की आलं-लसूण पेस्ट परतून घ्यावी,मग कांदा टाकून चांगला सोनेरी होईपर्यंत परतावा.
* गाजर आधी छान मिक्स करून घ्यावे आणि मटार घालून थोडे शिजू द्यावे.
* बटाटे कुस्करून त्यात घालावेत.
* चवीप्रमाणे वरील सर्व मसाल्याचे जिन्नस घालुन फिलींग
एकजीव करावे.
* हे सर्व होईपर्यंत ओव्हन १८०° सें प्रिहीट करून घ्यावे.
* आपल्या आवडत्या आकाराचे पेस्ट्रि शीटस् कट करून घ्यावेत.
* तयार सारण भरून कडांना किंचित पाण्याचा हात लावून सर्व पफ्स् तयार करावेत.
* ट्रे ला १ थेंब तेलाचं कोटींग करून घ्यावं आणि पफ्स् ठेवावेत.
* २००°सें ला १५-२० मिनिटे बेक करून घ्यावेत.
* ओव्हन बंद करून, साधारणपणे ७-८ मिनीटांनी उघडावे.
* ट्ड्यांग्...
पफस् रेडी..
🔷 पद्धत दुसरी
* मैद्यात मीठ,बेकींग पावडर आणि किंचित साखर मिसळावी, तूप वितळवून कोमट झाले की मैद्यात ओतावे.
* मैदयाला हे तूप व्यवस्थित चोळून घ्यावे, हाताने दाबल तर मुटका होऊ शकेल इतपत.
* कोमट पाण्यात फार घट्ट ना सैल अशी कणिक भिजवून घ्यावी.
१/२ तास रेस्ट होऊ द्यावी.
* तयार उंड्याची एक लांब पोळी लाटून घ्यावी, पोळीला तूप लावून त्यावर मैदा भुरभुरावा आणि दोन्ही बाजूंनी पोळी दुमडून घ्यावी.
* या पोळीवर पुन्हा तूप आणि मैदयाचा थर लावून, परत लांबसर पोळी लाटून घ्यावी.
* असे किमान ६-७ वेळेस करावे.
* नंतर फायनल पोळी लाटून आवडीच्या आकारात कापून पफस् बनवावेत.
जयश्री खराडे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment