Saturday, July 28, 2018

शंकरपाळी

शंकरपाळी

गोड शंकर पाळी एक वाटी साखर एकवाटी दुध एक वाटी तुप एकत्र साखर विरघळे पर्यंत  गरम करा त्यामध्ये मावेल तेवढा मैदा घालून मळणे  एकतासाने शंकर पाळी करणे दुध गार झाल्या नंतर मैदा घालून मळणे थोडा बारीक रवा घातला तरी चालतो

वैशाली हेगिष्ये
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷शंकरपाळे तळावे कि टाळावे

सुटल्या पोटावरही चरसी
दिवाळीचा फराळ
मनुजे खादाड हे सणवार
(चाल: तू वेडा कुंभार)

एका ऐन दिवाळीच्या तोंडावर मला एकदा हे विडंबन सुचलं. (ह्यात विठ्ठलाचा अपमान करण्याचा हेतू नसून, स्वतःस सावध करून, बारीक राहून स्वतःचा आत्मसन्मान वाढवण्याची लेखिकेची आंतरिक उर्मी चाणाक्ष वाचकांच्या ध्यानी आली असेलच. नसल्यास तो आबुदो समजावा व पामर लेखिकेस तत्क्षणी माफ करावे.) असली अवसानघातकी विडंबनं ऐन दिवाळीच्या तोंडावर ज्या गृहिणीला सुचतील ती गृहिणी आणि युद्धापूर्वी हतोत्सहित झालेला अर्जुन ह्यांत काहीही फरक नाही. पण नंतर प्रकटलेल्या गीतेत सांगितल्याप्रमाणे "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" ह्याचं पालन शत्रूंचं निर्दालन करताना ठीक आहे हो! पण सगळा फराळ करायचा आणि 'इदं न मम' असं म्हणत स्वतः मुळीच न खाता दिवाळी अत्यन्त सुखी असल्याचं मनाला भासवणं हा योग जमण्यासाठी गृहस्थाश्रमातून वानप्रस्थात जावं लागतं हो! पण मग तिकडे कुठे फराळाचा प्रश्न? तद्वत दिवाळीच्या तोंडावर अर्जुनासारखीच अवस्था झालेल्या मला *'शंकरपाळे  - तळावे की टाळावे'* हा मौलिक प्रश्न पडला होता.
पण तेव्हाच माझ्या प्राज्ञ डोक्याने तिसरा सुवर्णमध्य साधणारा पर्याय शोधला. (तसंही खादाडीचा प्रश्न असला की माझं डोकं खाद्यासक्त पर्याय आणि तर्क शोधण्यात खूप चपळ असतं.)
तर शंकरपाळी तळुही नयेत आणि टाळूही नयेत. मग काय करावे ते सांगते.

बेक्ड शंकरपाळी

साहित्य:

2 वाट्या कणिक,  अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी  पिठी साखर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, कणिक भिजवण्यासाठी दूध

कृती:

तूप पातळ (थोडं कोमट) करून परातीत घ्यावे त्यात पिठीसाखर घालून छान फेटून घ्यावं.

कणिक आणि बेकिंग पावडर ह्या फेटलेल्या मिश्रणात घाला आणि हाताने चोळून घ्या.

आता थोडे थोडे दूध (साधारण अर्धी ते पाऊण वाटी बसेल.) घालत कणिक घट्ट मळून घ्या.

मावे, ओव्हन, तंदूर 300 फँरेनहाईट वर तापवून घ्या.

बेकिंग ट्रेला अल्युमिनीम कागद लावा, त्याला एक तुपाचा हात लावा.

आता छानसे शंकरपाळे कातून घ्या. ते ह्या ट्रेवर ठेवा. एकमेकांना चिकटू देऊ नका. शंकरपाळे लाटताना ते आपल्या तळणीच्या पारीपेक्षा थोडे जाड असुद्यात.

साधारण 30 ते 35 मिनिटे मावे किंवा ओव्हन मध्ये होऊ द्या. माझ्याकडील विद्युत तंदूरमध्ये चालू (२मिनिटे) बंद (1.30 मिनिटे) असं करत 10 ते 12 मिनिटांत होतात.

बाहेर काढून थंड होऊ द्या. मग.. खादाडणेवाधिकारस्ते मा चिंतेषु कदाचन😄

© दीप्ती पुजारी

न्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment