आइस्क्रीम
१ लिटर दूध
२ कप फुल क्रिम (अमूल चा एक पॅक)
३०ग्रॅम कस्टर पावडर
साखर २ वाट्या
कृती
दूध गरम करायला ठेवावं .एक वाटी मधे कस्टर पावडर व दूध एकत्र करून गुठळ्या होउ न देणे.मग गरम दूधात हे मिश्रण घालून भराभरा हलवत शिजवावे.दूध घट्ट झाले की गॅस वरुन काढून थंड करून त्यात साखर घालून व क्रिम घालून सगळं हॅन्ड ब्लेंडर नी एकत्र करून पहिले २ तास फ्रिज मधे ठेवून परत ब्लेंन्डर मधून फिरवून परत रात्रभर अथवा ६-८ तास फ्रिजर मधे ठेवावे.
मॅंगो कस्टर पावडर घेतली तर साखरे बरोबर आमरस पण घलता येईल.
रेणुका
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
अमूल च क्रीम दूध
काँडेन्सड मिल्क
कोको पावडर
कृती - अमूल क्रीम हँड मिक्सर ने 10 मिनटं फेटा
दूध सॉफ्ट होत
दुसऱ्या भांड्यात कडेन्सड मिल्क व कोको पावडर 4 ते 5 चमचे मिक्स करून फेटने
सॉफ्ट दुधात हे मिश्रण मिक्स करून नीट मिक्स करणे
आणि एअर टाईट डब्यात ओतून फ्रीझर मध्ये 6 तास ठेवणे
🍧🍧
याची कुल्फी पण छान होते
मी केलं आहे
आणि छान झालं होतं
याच प्रमाण अमूल दूध अर्धा लिटर
काँडेन्सड मिल्क अर्धा च्या थोडं कमी
कोको पावडर 3 ते 4 चमचे
थोडी जास्त घातली तरी चालते
चॉकलेट flavour येतो
वैजयंती जोशी
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
१ लिटर दूध
२ कप फुल क्रिम (अमूल चा एक पॅक)
३/४ कप कंडेन्सड मिल्क
कृती
सगळं हॅन्ड ब्लेंडर नी एकत्र करून पहिले २ तास फ्रिज मधे ठेवून परत ब्लेंन्डर मधून फिरवून परत रात्रभर अथवा ६-८ तास फ्रिजर मधे ठेवावे.
रेणुका
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment