Tuesday, July 24, 2018

चिकू स्मूदी

चिकू स्ट्रॉबेरी स्मूदी (दोघांसाठी)

साहित्य

२ पिकलेले चिकू, ४-५ ताजी स्ट्रॉबेरी, एक छोटी वाटी गोडे दही, चमचाभर मध (ऐच्छिक )

कृती

चिकू आणि स्ट्रॉबेरी स्वच्छ पाण्याने धुऊन पुसून घ्यावेत. चिकूच्या देठ आणि बिया काढून चार-चार तुकडे करावेत. स्ट्रॉबेरीचे देठ काढून दोन-दोन तुकडे करावेत. चिकूचे आणि स्ट्रॉबेरीचे तुकडे, दही आणि मध मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करुन मिक्सरवर एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यावे. तयार स्मूदी पेल्यांमध्ये/ ग्लासांमध्ये ओतून वर चिकूचे छोटे तुकडे घालून सजवून प्यायला द्यावे.

© सौ. प्रीति कामत-तेलंग

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment