Saturday, July 28, 2018

बाळाचा खाऊ

तांदूळ,त्याच्या निम्मी मूग डाळ स्वच्छ धुवून, निथळून कापडावर वाळत घालून, कोरडे झाले की खमंग भाजून घ्यावे.
त्यात थोडेसे जिरे आणि काजू बदाम पण भाजून घ्या.
थंड झाल्यावर मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्या.
खायला देताना पाण्यात ही पावडर व्यवस्थित मिक्स करून छान शिजवून घेऊन,एक चमचा घरचं साजूक तूप घालून बाळाला खाऊ घाला.चवीपुरते मीठ घालून द्या.

जयश्री खराडे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷एक वाटी तांदुळ व तेवढीच मुगडाळ व त्यामध्ये १५ ,२० बदाम घातले  व बारीक करुन नंतर लागेल तसे घेऊन त्यची दुधात कांजी बनवावी ,बाळाला कोणतेही नवीन अन्न चालु करताना प्रथम थोडेच भरवावे,ते व्यवस्थीत पचल्यानंतर हळुहळु आहार  वाढवावा ,त्यचबरोबर नाचणीसत्व कांजी गुळ घालुन ,गव्हाची कांजी,भातावरची पेज,मटणाचे सुप,डाळीचे पाणी,उकडलेला बटाटा,उकडलेल अंड,सफरचंदाचा आतील गर,चिकु गर,देऊ शकता ८ ते ९ महीन्याच बाळ असेल तर त्याला दात यायला सुरूवात झाली असेल,तेव्हा हळुहळु चौरस आहार चालु करावा,कुठलाही आहार बाळाला अगदी थोड्या प्रमाणात चालु करून वाढवल्यास शक्यतो बाधत नाही,८ ते ९ महीन्याची बाळं रांगायला लागतात आणी दिसेल ती वस्तु तोंडात घालतात ,त्यामुळे इन्फेक्शन होते व पचऩाच्या तक्रारी होतात ,ताजे दही सुद्धा बाळांसाठी चांगले आहे,१ वर्षाचे बाळ आपल्या ताटात जेवले पाहीजे.

डॉ.संध्या झाडे

न्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment