🔷 केळ्याची कोशिंबीर
केळ्याचे काप करून घ्यावेत.यात दही, मीठ,साखर, मिरची, कोथिंबीर घालून हलवावे.
🔷गाजराची मोहरी फेसून कोशिंबीर गाजरे किसून घ्या. थोडी मोहरी फेसून त्यात दही आणि मीठ घालुन एकत्र कालवा.आवडत असल्यास थोडी साखर घाला.
अंजली जोशी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷बीट कुकरात उकडून घेणे. त्यात बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेला टोमॅटो, दाण्याचं कूट, मीठ, साखर, कोथिंबीर आणि भरपूर दही घालून एकत्र कालवावे.
🔷पालकाची कोशिंबीर.
बारीक चिरलेला पालक, बारीक चिरलेला खजूर, मीठ, जिऱ्याची पूड, आणि भरपूर दही.
कालवल्यावर थोड्या वेळाने खावी. खूप छान लागते.
नीता गोखले.
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷मुळा किसून त्यावर भरपूर मोहरी, कढिपत्ता, हि मिरची, हळद, हिंग यांची फोडणी घालून दही, कोथिंबीर, दाणेकूट, मीठ घालून एकत्र करुन घ्यावे.
दीपाली
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷मोड आलेले मूग आणि मटकी आणि कॉन corn वाफवून घ्यावे कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घालावे लिंबू पिळावे वरुन हिंगमोहरी जिऱ्याची फोडणी घालावी हवी असेल तर बारीक शेव घालावी.
🔷गाजर बीट किसून वाफवून घ्यावे मक्याचे दाणे वाफवून घ्यावे कांद्याची पात बारीक चिरून घालावी त्यात संत्र्याच्याफोडीडाळिंबाचे दाणे मीठ मिरपूड सँलड ड्रेसिंग घालून मिक्स करावे एकदम टेस्टी आणि हेल्दी
डॉ.अर्चना चव्हाण
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷अवकाडोची कोशिंबीर (ग्वाकामोले उर्फ ग्वाक)
हा मुळचा मेक्सिकन पदार्थ अमेरिकन जनतेने आपलासा केलाय. आपल्याकडील मसालेभात आणि पुलावाचा सख्खा भाऊ शोभेल अशा ‘बरीटो’भाताबरोबर ही हवीच हवी. पण तसेही थंडीच्या मोसमात ही कोशिंबीर पौष्टिक म्हणून अवश्य खावी असे इकडचे आहारतज्ञ सांगतात.
आधी हे रायते मी इकडच्या हॉटेलमध्ये चाखले. आवडले म्हणून घरी करुन पाहिले. तुम्हाला अवकाडो फळे मिळाली तर जरूर करुन पहा. आपल्याकडच्या कवठाच्या गरासारखीच पण थोडी निराळी चव ह्या फळाच्या गराला असते.
साहित्य
२ पिकलेली अवकाडो फळे, १ छोटा कांदा, १ लालबुंद टोमॅटो, वाटीभर कोथिंबीर, दोन मिरच्या, अर्ध्या लिंबाचा रस, २ लसूण पाकळ्यांचा ठेचा (ऐच्छिक), मीठ (चवीनुसार)
कृती:
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरच्या हे सर्व बारीक चिरून घ्यावे.
अवकाडो फळाचे दोन तुकडे करावेत. आतली बी काढून टाकावी आणि चमच्याने फळातला सगळा मऊ हिरवागार गर खरवडून एका वाडग्यात काढून घ्यावा. त्यावर लगेच लिंबाचा रस ओतावा म्हणजे गराचा रंग बदलणार नाही. आता सगळा गर आणि मिरच्या, कोथिंबीर (पाट्यावर/ रगड्यावर किंवा मिक्सरवर ) एकत्र करुन चटणी प्रमाणे दाट वाटून घ्यावे. वाटलेल्या मिश्रणात कांदा, टोमॅटो, लसूण ठेचा आणि शेवटी मीठ घालून कालवून घ्यावे की झाली कोशिंबीर तयार.
© सौ. प्रीति कामत-तेलंग
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷लाल कोबीची कोशिंबीर
साहित्य
कोबी बारीक चिरून घ्यावा, टाँमेटो बारीक चिरून, डाळिंब सोलून दाणे घ्यावेत, 1 चमचा पनीर कुस्करून, कोथिंबीर बारीक चिरून, तिळ तेल, मिरी पावडर, सैधव मीठ, लिंबू रस १ चमचा , पुदिना पान.हे सर्व व्यवस्थित ढवळून मिक्स करुन घेणे. रंगेबीरंगी कोशिंबीर खुप छान लागते
वंदना मंकिकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
केळ्यांची कोशिंबीर
साहित्य:
केळी २ ते ४,
बारीक मीठ चवीनुसार,
शेंगदाण्याचा कूट ४चमचे,
दही अर्धी वाटी,
साखर १ चमचा,
कोथिंबीर थोडीशी,
हिरवी मिरची १.
कृती
*केळीचे हवे तसे काप करून घ्या( उभे, लांब, छोटे, मोठे)
*त्यामध्ये दही, साखर, मीठ, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे.
*वरून मिरचीचे छोटे तुकडे करून जरासं तूप/तेलावर भाजून घालावेत.
*खायला केळयाची कोशिंबीर तयार 😊😊
सौ. वैशाली वेटाळे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment