Saturday, July 28, 2018

भाताचे प्रकार

🍆वांगे भात🍆

वरती फोटो मध्ये आहेत तशी वांगी घेऊ नये😛
वांगे
तांदूळ
गरम मसाला किंवा खडा मसाला
(खडा मसाला म्हणजे एक तेजपान, एक जंगली विलायची,लवंग,शहाजीरे, काळीमिरी)
धनेजिरेपूड
लसूण मिर्ची अद्रक पेस्ट
हळद
मीठ
मोहरी जिरे

कोवळे पांढरे जांभळे रंगांचे असतात ते वांगे उभे चिरून गार पाण्यात घालून ठेवायचे

१ वाटी तांदूळ असेल तर १ १/४ पाणी घालून मोकळा भात शिजवून परातीत पसरवून त्यावर लिंबू पिळून ठेवा

एक कढई मध्ये तेल घेऊन त्यात मोहरी जिऱ्याची फोडणी कडीपत्ता टाकून घ्या.
(खडा मसाला वापरत असाल तर आताच परतून घ्या)

फोडणीत अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकून नंतर हळद आणि खडा मसाला वापरत नसाल तर इथे गरम मसाला टाकून घ्या

या मिश्रणात गार पाण्यात ठेवलेली वांगी कोरडी करून टाका आणि परतून घ्या

सगळ्यात शेवटी मीठ टाकून  वांगी मऊ झाली की त्यात लिंबू पिळून ठेवलेला भात टाकून परतून एक सणसणीत वाफ येऊ द्या
जेवायला देतांना त्यावर कोथिंबीर घालून द्या..

राईस मिक्स,

चिंच,गूळ,भाजलेल्या तिळाचा कूट, त्यात तिखट मीठ हळद हिंग..
चिंच उकळून त्यात गरम असतानाच टाकलेला गूळ,
आणि गार झाला झाल्यावर त्याचा काढलेला गर..
त्या गराला परत गरम करून त्यात तिखट मीठ हळद हिंग तिळ चा कूट घालून एक वाफ देऊन गार करून काचेच्या बरणीत भरून ठेवायच हे मिक्स...

भार्गवी दीक्षित
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

वांगी भात

छोटी छोटी वांगी
तांदूळ
खड़ा मसाला
लवंग ,दालचीनी ,तमाल पत्र
काळी मिरी ,ही वेलची,
भरली वांगी करण्यासाठी घेतो तसे वाटन मीठ
तांदूळ धून घेणे
एका पातेलित तुपावर खड़ा मसाला फोडणी देऊन त्यावर तांदूळ घालून चांगले भाजुन घेणे व बेतशिर पाणी घालून भात शिजायला ठेवणे तो पर्यन्त वांगी व भरून घेणे भातातील पाणी आटले की भातामध्ये ही वांगी पेरून ठेवणे व भात निम्बरसा ठेवणे दणदणीत वाफ येऊ देणे

ममता संसारे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

नारळी भात

साहित्य

१ वाटी बासमती तांदूळ साधू बासमती असल्यास उत्तम
३/४ वाटी किसलेला नारळ(खोबरे)
३/४ वाटी किसलेला गूळ
३/४ लवंगा
१/२ चहाचा चमचा केशर
२ वाट्या पाणी
१/४ वाटी ड्राय फ्रुट ( काजू, बदाम, मनुके व इतर आवडीनुसार) बारीक काप
२मोठे चमचे साजूक तूप

कृती

प्रथम तांदूळ धवून पाणी निथळून घ्यावे, व 45 मिनिटे बाजूला ठेवावेत,
एका छोट्या पण मध्ये 1 चमचा तूप घेऊन सर्व सुखा मेवा सोनेरी रंगावर परतून घ्यावा
जाड बुडाच्या भांड्यात उरलेलं सर्व तूप घालावे, मंद आचेवर गॅस ठेवावा. तूप गरम झाल्यावर त्यात लवंगा टाकाव्यात, लवंगा छान फुलल्या आणि त्याचा छान आरोमा यायला लागल्यावर धुतलेले तांदूळ तुपात घालावेत.

तांदळाच्या प्रत्येक दाण्याला तूप लागेपर्यंत तुपात छान परतून घ्यावेत.आता त्यात 2 वाट्या पाणी घालून  झाकण ठेवावे, तांदूळ अर्धवट शिजला की त्यात किसलेले खोबरे आणि गूळ घालून एकजीव करावे. ड्राय फ्रुट आणि केशर घालावे
हलवताना भाताचा दाणे अख्खे राहतील याची काळजी घ्यायची.भात शिजल्यावर त्यावर किसलेले खोबरे घालून सजवा, गरमागरम सर्व्ह करा.

शिल्पा कापुरे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

वांगी मधे मसाला काय घालयचा!

भाजलेले कांदा खोबरे ,ग मसाला ,धने जिरे पावडर ,रोजचा लाल मसाला ,हळद ,मीठ ,चिंच कोल ,गूळ येकत्र करून वाटून नंतर बारीक चिरून कोथिबीर घालून वांग्यात भरावे

वैशाली मोजरकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

टाँमेटो राईस

१ वाटी तांदूळ, २टाँमेटो, १ कांदा, आल , १मिरची,कोथिंबीर, तिखट आवडी प्रमाणे, हळद, मिठ, एक मँगी मसाला वडि, तेल, तुप ,४काळिमीरी , ३ लवंगा, तेजपत्ती, काजू आवडी प्रमाणे तांदूळ धुवून घेणे, कुकर गरम करुन त्यामध्ये तेल टाकणे, गरम झाल्यावर काळिमीरी, लवंगा, तेजपत्ती टाकणे, त्यावर कांदा बारीक चिरुन टाकणे, कांदा परतून घेणे , पारदर्शक झाल्यावर त्यात तांदूळ टाकून परतणे, काजू टाकणे,  लाल तिखट,हळद , टाकणे, टाँमेटो, आल, मिरची, कोथिंबीर वाटून घेणे, हे वाटण तांदळावर टाकणे, त्या मधे गरम पाणी घालणे, मँगी मसाला वडि घालणे,मिठ टाकणे मिठ थोड कमी घालावे कारण मसाला वडित मिठ आहे, कुकरच झाकण लाऊन एक शिट झाल्यावर गँस कमी करुन ३ ते ४ मिनिटे ठेवून गँस बंद करणे, वाफ गेल्यावर झाकण उघडून तुप घालणे.

वंदना मंकीकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

झटपट मेक्सिकन राईस

आजच सकाळी मस्त आयत्या breakfast ची मेजवानी मैत्रिणी कडून...Girls Talk..!!
रेसिपीत थोड्याशा additions माझ्याकडून..😊

साहित्य : बासमती तांदूळ, भरपूर लसूण ,राजमा (४-५ तास भिजवून आणि कुकर ला ४-५ शिट्ट्या घेऊन मऊ शिजवून घ्यावे),वाफवलेले corn, गाजर,लाल- पिवळी शिमला मिरची, कांद्याचे चौकोनी तुकडे, कांद्याची पात, मिरे पूड, चिली फ्लेक्स,मिक्सड हर्बज्, मीठ, टोमॅटो केचप, टोमॅटो चिली सॉस,olive oil

कृती

pan मधे तेल गरम झाल्यावर तांदूळ स्वच्छ धुवून सोनेरी रंगावर परतून घ्यावेत
* त्यात बारीक चिरलेला लसूण, कांद्याचे तुकडे आणि गाजर टाकून व्यवस्थित परतून घ्यावे.
* राजमा आणि corn मिक्स करावा.
* मिरे पूड, चिली फ्लेक्स,मीठ टाकावं.
*टोमॅटो केचप, चिली टोमॅटो सॉस टाकून व्यवस्थित परतून भात छान शिजवून घ्या.
*कांद्याची पात, बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून नीट मिक्स करून,gas बंद करावा.
झाकण ठेवून १० मिनिटे तसेच ठेवावे.

सर्व्ह करताना पात टाकून द्यावे.
थोडी वेगळी चव लागते न मुलांना पण आवडते.

जयश्री खराडे.
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
वांग्याच्या भरीताची बिर्याणी

साहित्य

वाग्याचे भरीत  बासमती तांदूळ  खडा मसाला तूप तळलेला लांबडा कांदा  मोठ्या वाग्याच्या गोल चकत्या मीठ  बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात  भिजून ठेवणे  एका पातेल्यात तांदळाच्या दिड पट  पाणी गरम करून त्या मध्ये मीठ खडा मसाला तूप लींबु रस घालणे नंतर त्या मधे तांदूळ घालून भात तयार करून घेणे मातीच्या भांड्यात कोकणात आम्ही त्या भांड्याला सोरकी म्हणतो त्या भांड्यात तेल घालणे  त्यावर  तळाला चकत्या लावणे त्यावर तयार भात  भातावर वांग्याचे भरीत नंतर तळलेला कांदा असे एकावर एक थर लावणे  शेवटी साजूक तूप टाकून  झाकण ठेवणे  झाकण घट्ट बसले पाहिजे  वीस मीनटात बिर्याणी तयार वरून कोथिंबीर घालणे

वैशाली हेगिष्टे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

क्षीरोदन आणिक काबुली कोरमा पुलाव

कधीतरी डिस्कवरी वरील एक खाद्यपदार्थांचा भाग पहात असताना तांदुळासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राचीन शब्दांची व्युत्पत्ती मला खूप भावली.
ग्रीक भाषेतला ओरायझा, लॅटिन मधला ओरिझा, अरबीमधला अरुझ्झ,   इटालियन रिसो, इंग्रजी मधला राईस एवढेच नव्हे तर संस्कृतमधला वरिसि ह्या सर्व शब्दांचे पितृपद तामिळ भाषेतील *अरिसी* ह्या शब्दाने भूषविले असल्याचे त्या डोकमेंट्रीमध्ये सांगितले गेले होते.
पूर्वापारपासून भात हे जगभरातील लोकांचं आवडीचं अन्न आहे. आपल्या रामायण महाभारत ह्या कथांतून तत्कालीन खाद्यसंस्कृतीचा इतिहासही अनुभवण्यास मिळतो. कुठेशी ऐकले की हळद, मसाले, दही लावलेलं हरणाचं मांस घालून शिजवलेल्या भाताची पाकृ ही सीतामाईंची अगदी स्वाक्षरी पाकृ होती. ही पाकृ म्हणजे नि:संशय आपल्या बिर्याणीची खापरपणजी असणार.
तर एवढी समृद्ध भातसंस्कृती असलेला आपला वारसा. मी उगाच परदेशी पाकृ का टाकतेय भाताची?
सोप्प कारण. एत्तदेशीय भातपाकृ सगळ्या अन्नपूर्णांनी लिहून काढल्याने आम्हास जास्त रंग दाखविणेचा वाव मिळाला नाही. परंतु एक पाकृ, जिचे वर्णन मी स्वतः  महाभारतावरील बर्याच पुस्तकांत वाचले आहे, त्यात काही स्वतःची भर घातली आहे तीही इथे टाकणार आहे. तर सादर आहेत एका प्रत्यंचेत दोन पाकृबाण.
क्षीरोदन (महाभारतकालीन पाकृचे यशस्वी पुनरुज्जीवन. यशस्वी म्हणजे सर्व लोक आवडीने खातात ती.🤪)

साहित्य:

३वाट्या दूध, १वाटी सुगंधी तांदूळ (बासमती, आंबेमोहर, इंद्रायणी इ), पाऊण वाटी मध, २ वाट्या पाणी, अंजीर, मनुका, काजू, बदाम ३ पेर दालचिनी, २ तमालपत्र, ४ लवंग,तूप.व

कृती:

प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवा.
दूध आणि 2 वाट्या पाणी एकत्र करून उकळायला ठेवा.

आता जाड बुडाच्या भांड्यात तूप घेऊन त्यात लवंग, तमालपत्र व दालचिनी घालून परतून घ्या.
मग अंजिराचे तुकडे, मनुके आणि सुक्या मेव्याचे काप त्यात घालून परतून घ्या.
गरम दूध पाण्याचे मिश्रण भांड्यात ओता.त्याला उकळी आली की धुवून निथळून ठेवलेले तांदूळ वैरा.
झाकण ठेवुन शिजू द्या. (महाभारत काळात कुकर नसावा म्हणून कुकर नाही)
भात उमललेल्या नंतर मध टाका. (यावेळेस मी थोडे मीठही टाकते. तेव्हा आयुर्वेद तयार झाला होता की नाही हे मला ठाऊक नसल्याने ह्या विरोधी अन्नकडे मी कानाडोळा करते आणि चविकडे मृगनयनांतून पहाते.☺️)
भात शिजला की त्यावर भाजलेले पांढरे तीळ घालून सजवू शकता.
गरम किंवा गार, जेवणात किंवा नाश्त्याला कधीही हा क्षीरोदन ग्रहण केला जाऊ शकतो.

काबुली कोरमा पुलाव

साहित्य:

१ वाटी बासमती तांदूळ
वेलची, दालचिनी आणि मिरे यांची भरड 2 च चमचे (च चमचे म्हणजे टी स्पून)
५-६ काळीमिरी
२तमालपत्र
१गाजर लांबट पातळ चौकोनी तुकडे
बेदाणे (ह्यात काबुली लोक  सढळ हात वापरतात)
सजावटीसाठी सुका मेवा

पाव किलो मांस (हळद, लिंबू, मीठ, आलं लसूण वाटण लावून १५ मिनिट मुरवलेले) किंवा मिश्र भाज्या (फरसबी, गाजर, फ्लॉवर,वाटाणा, बटाटा अश्या नेहमीच्या यशस्वी भाज्या)
१-२मोठे कांदे,
आलं लसूण वाटण,
१-२टोमॅटो बारीक चिरून
हिरव्या मिरच्या वाटून
अर्धी वाटी फेटलेले घट्ट दही, जिरेपूड, मिरपूड

कृती:

कोरमा करण्यासाठी
तूप तापवून कांदा गुलाबी परता, त्यात हळद, जिरेपूड, मिरपूड, आलं लसूण वाटण घालून परतून घ्या.
आता मांस किंवा नेहमीच्या यशस्वी भाज्या घालून परता.
टोमॅटो आणि मिरच्या टाका.
दही घाला, मीठ घाला.
अगदी अंगाशी रस्सा होईल असे पाणी घालून झाकून मंद आचेवर शिजू द्या.

पुलाव

तांदूळ धुवून निथळत ठेवा
एका पातेल्यात थोडे तुप गरम करून तमालपत्र आणि काळीमिरी टाका. त्यावर 3 वाट्या उकळते पाणी घालून तांदूळ वैरा. मीठ घालून ढवळत ढवळत अर्धा कच्चा शिजलेला भात पाणी काढुन चाळणीत पसरून ठेवा.
आता एका जाड बुडाच्या पातेल्यात हा भात डोंगर  लावल्यासारखा ठेवा.आधीच्या पातेल्यात परत उरलेलं तूप गरम करून क्रमाने खलील गोष्टी परतून घेऊन भाताच्या डोंगरावर घाला: बेदाणे,  गाजर तुकडे आणि १ च चमचा साखर (एकत्र), ३ १ च चमचा साखर सोनेरीसर होईपर्यंत, वेलची, दालचिनी आणि मिरे यांची भरड.

आता कोरमा अर्धवट शिजला आहे  आणि भाताचा डोंगर तयार आहे. ह्या डोंगराला ज्वालामुखीसारखे मुख करू  त्यात कोरमा घाला. मुख बंद करा. भातावर पाण्याचा हबका मारून  मग भांड्याचे झाकण त्यावर ठेवून वाफ बाहेर जाऊ नये म्हणून कणकेने वा रुमालाने लिंपून मंद आचेवर 10 मिनिटे दम करा.मग १५ मिनिटे तुम्ही दम धरा मगच झाकण उघडा.वाढताना वर सुक्या मेव्याने सजवा.

वाचायला क्लिष्ट वाटली तरी एकदा केल्यावर डोक्यात बसते व चटकन होते ही पाकृ.
आता करून पाहा नक्की म्हणजे ह्या लेखनाची इतिकर्तव्यता होईल.🙏

© दीप्ती पुजारी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

फ्राईड राइस

एक वाटी  दिल्ली राइस धूऊन  तुपात   परतावा  जूना  तांदूळ   असेल तर  ३वाट्या  गरम  पाणी   घालून मीठ  चवीनुसार  घालावे नेहमीच्या भाता  प्रमाणे   साधा  भात  करावा  तो  भात१/२तास  आधीच   करून  ठेवावा .. म्हणजे   गार  भात  असावा..   ""भाताचे   नाव  फ्राईड  राईस""  फरसबी निवडून   त्या चे  उभे   काप  करावेत . सिमला  मिरची चे उभे   काप  करावेत .कांदे  २/३  घ्यावे त  त्या चेही  बिर्याणीला  पातळ  उभे चिरुन  घेतो  तसाच   उभा  कांदा   चिरुन  घ्यावा .गाजर  एखादा घेऊन   धूऊन  त्याचे  साल  काढून   मग  त्याचेही   उभे   काप करावेत  .एक  कांदा पात  गड्डी  घ्या ..ति जितकी   बारीक   चिरता  येईल  तेवढी   बारीक   चिरून   बाजूला   ठेवा .. २/३हिरव्या  मिरच्या  त्या सुद्धा  अर्ध्या चिरुन  उभे   काप  करा   

कृती

प्रथम  कढईत  तुप  एक   पळी  घालावे .त्यात  कांदा  चांगला   परतावा  तो  एका  प्लेट मधे  काढून   ठेवा .आता फरसबी व  गाजर परतुन चांगले  परतले   कि बाजूला  प्लेटीत  काढून   ठेवा .आता सिमला  मिरची   व  साध्या   हिरव्या मिरच्या  तूप   लागत   असेल   तर  परत  थोडे   घालावे   मीठ  चवीनुसार  घालावे   कारण   भातात  मीठ   घातलेले  आहे .  आता  सर्व भाज्या   एकत्र   कराव्यात  ..आधीच   भात  केले ला  आहे  तो परातीत घेऊन  उलतन्याने  पसरावा .आणि  २/३चमचे  सोया  साॕस घालावा  ..तसेच  दोन   चिमूटभर अजिनोमोटो  घालावा   (पण  सद्या  खाऊ  नये  असे म्हणतात म्हणून   नाही   घातला   तरी  चालेल )  पूर्वी   मी  घालायचे ..ते  घातल्याने  छान   चवीला   भात   लागतो...आता  सर्व   एकत्र   करून   एक   वाफ द्यावी   नंतर   कांदा  पात  घालून   परत  भात  हलक्या   हाताने  परतावा.....२०वर्षा  पासून    मला  बक्षिस  गणपती च्या  वेळी   स्पर्धा  असतात  तेव्हा  मिळते ... आणि   मग  सासर व  माहेर  आणि   इतर  पाहुणे   आले  कि  प्रथम   मेणू  ठरवताना  ह्या भाताची  कायम  फरमाईश  ठरलेली   असते

सौ.सुनंदा  शिंदे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

वांगी भात

बर्याच वेळेस चांगल्या गोष्टीं अपप्रचारामुळे नावडत्या बनतात नाहीतर त्यांना दूर तरी लोटले जाते.वांगे हे त्यापैकीच एक.संधिवात म्हटले तर सर्वात पहिला गदा येते ती बिचार्या वांग्यावर. वांग्यावर वातूळपणाचा चांगलाच शिक्का बसला आहे.जुन वांग्यांच्या बाबतीत ते काहीसे खरे आहे.पण कोवळी लुसलुशीत छानशी वांगी खरंतर खूप आरोग्यदायी आहेत.आयुर्वेदानुसार त्रिदोषहर गुण अशा वांग्यात आहेत.तर यापुढे कोणतीही अढी मनात न ठेवता वांग्याला आपल्या Good Books मधे ठेवाल ना?
वांगी भात ही कर्नाटकची पारंपारीक डिश आहे. यासाठी हिरवी लांब वांगीच(मैसूरू वांगी) वापरतात.

साहित्य:

हिरवी लांब वांगी६-७,तयार भात ४वाट्या,चिंच लिंबाएवढी,गूळ 1चमचा,मीठ चवीनुसार.
मसाल्यासाठी साहित्य:
हरबरा डाळ २लहान चमचे,उडीद डाळ2 ल.चमचे,लवंग३,दालचिनी १इंच,वेलदोडे २,धणे ५ ल.चमचे,मेथी १/२ ल चमचा,हळद १/४लहान चमचा,सुक्या खोबर्याचा किस ६ल.चमचे
फोडणीसाठी साहित्य:
तेल ४चमचे,मोहरी १चमचा,हरबरडाळ२ चमचे,उडीदडाळ २ चमचे,कढीपत्ता २काड्या,शेंगदाणे ३चमचे.

कृती

सर्वप्रथम ४वाट्या होईल एवढा छानसा मोकळा भात शिजवून घ्या.मसाल्या साठी साहित्य मंद आचेवर खरपूस भाजून घ्या व थंड झाल्यावर मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
चिंच भिजत घाला.वांग्याचे साधारण १इंचाचे उभे काप करून लगेचच पाण्यात टाकावेत... नाहीतर काळे पडतात.
फोडणीसाठी तेल गरम करून त्यात फोडणीचे साहित्य एकेक करून टाकावेत.नंतर पाण्यातून निथळलेल्या वांग्याच्या फोडी फोडणीत परतून घ्याव्यात.त्यानंतर त्यात मिक्सरवर वाटलेला मसाला घालून थोडावेळ परतावे.चिंचेचा कोळ घालून एक वाफ आणावी.नंतर तयार भात व चवीपुरते मीठ घालून चांगले एकत्र करावे.मस्त चवदार पोटभरीचा नाष्ता तयार.

अस्मिता भस्मे.
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
मटार मेथी पुलाव 

साहित्य

मेथीची भाजी एक जुडी मटार आल लसूण मीरची पेस्ट  खडा मसाला  कांदा बारीक चिरून  तांदूळ धुवून ठेवणे एका पातेलीत तेल टाकून त्या मध्ये  बारीक चिरलेला कांदा टाकून परतणे त्या मध्ये आल लसुण  मीरचि पेस्ट  बारीक चिरलेली मेथी टाकून परतणे झाकण ठेवून एक वाफ काडणे दुसरे पातेल घेऊन त्यामध्ये  ते ल टाकून खडा मसाला टाकून तांदूळ  परतणे  परतलेले तांदूळ मेथीच्या भाजीत टाकून त्या मध्य मी ठ साखर एक चमचा  टाकून गरम पाणी टाकून  ढवळावे भात शिजत आल्यानंतर झाकण टाकून वाफ आणणे सर्व करता ना वरती कोथिंबीर खोबर घालणे  ग्रीन मटार मथी पुलाव तयार

वैशाली हेगिष्टे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

पालक भात

साहित्य

तेल,खडा मसाला(दालचिनी,लंवग, काळीमिरी,मोठी वेलची,शहाजिरे),कांदे,आलं, लसूण,मिरच्या, टोमॅटो,गरम मसाला,मीठ,काजू,पालक गड्डी,तांदूळ

कृती -

पालक पाने निवडून ,शिजवून त्याची पेस्ट करावी.आले-लसूण पेस्ट करावी,टोमॅटो वाटून घ्यावा.
तेल- खडा मसाला, कांदा + आलं-लसूण, मिरची,टोमेटो वाटण+ पालक पेस्ट परतावी. तांदूळ ,गरम मसाला, मीठ टाकून भात शिजवावा.
तळलेला कांदा, काजूने सजवावे.

सीमा दळी

धन्यवाद!!

#ज्ञानभाषा प्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment