🔷दलियाचा ऊपमा
१वाटी दलीया १वाटी मटार लांबट तुकडे केलेले गाजर फरसबी १कांदा बारीक चीरलेला ४/५ मिरच्या, मीठ, राई
कुकर गरम झाल्यावर त्यात तेल टाकणे नंतर तेलावर राई कडीपत्ताकांदा मटार गाजर फरसबि दलीया मीठ किंचीत साखर टाकून २मोठे चमचे तूप घालून परतणे .दलीयाच्या ३पट पाणी घालणे कूकरचे झाकण लावून ३शिट्या करणे नंतर २मिनीट ग्यास बारीक करुन ठेवणे कूकर ऊघडून ऊपमा चांगला परतणे आणी देताना कोथिंबीर खोबर घालून देणे ऊपम्याची रेसीपी लिहीताना चुकून अर्धा मेन्यू वरती गेला आहे.
विद्या शेट्ये
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷ज्वारीचा उपमा
आदल्या दिवशी थोडी ज्वारी भिजत घाला.दुसऱ्या दिवशी ती कूकर वा प्रेशर पॅनला ५-६ शिट्ट्या काढून चांगली उकडून घ्या.कांदा,टोमॅटो,गाजर,फरसबी,भोपळी मिरची चिरून घ्या.उकडलेले कॉर्न वा मूग असतील तर,घ्या
तेलाच्या फोडणीवर मिरची,कढीपत्ता,थोडी उडदाची डाळ घालून त्यात सगळया भाज्या परतूनं घ्या.त्यात उकडलेले ज्वारी घाला मीठ घाला,.एक दोन वाफ आल्या की उतरवून लिंबू पिळा.कोथिंबीर घालून गरम गरम खायला घ्या.
खूप पौष्टिक,फायबर युक्त,आणि भाज्यांच्या गुणांनी भरलेला बेस्ट नाश्ता.
अंजली जोशी
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment