Saturday, July 28, 2018

थालीपीठ

थालीपीठ

साहित्य

तांदळाचा रवा ,१वाटी  किसलेली काकडी ,१ते २वाट्या ओवा  १चमचा ,  मीठ मिरची चवीप्रमाणे  पाणी, तेल .

कृती

रवा ,काकडीचा कीस  मिरची ओवा , मीठ एकत्र करावे . थालीपीठा पेक्षा थोडं पातळच पीठ ठेवावं ..
फडक्याला पाण्याचा हात लावून थालीपीठे थापावीत . रंग हलका हिरवा येतो . चवीला मस्त  लागतात . वाटले तर तीळही घालू शकता .

डॉ.वृंदा कार्येकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

थालिपीठ

साहित्य:

काकडी/दाडादोडा,लालतिखट,मीठ,ज्वारीचे पीठ,तेल,ओवा,तीळ

कृती:

काकडी किसून घ्यावी.त्यात मीठ,तिखट,ओवा,तीळ,ज्वारीचे पीठ घालून मळावे.तव्यात पातळ थापून खरपूस भाजावे.गरमागरम छान लागतात.दही,लोणचे किंवा तसेच खावे.

सौ.वैशाली पाटील
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

भोपळ्याचे थालीपीठ

एक वाटी  कोथींबीर  बारीक   चिरून +आल  लसूण   पेस्ट   एक   चमचा  +ज्वारी   पिठ  २ वाट्या,,+  मीठ   चवीनुसार   आणी     जिरेपूड   थोडा   ओवा      हिरवी  मिरच्या  २ किंवा   लाल  तिखट   हे सर्व   दुधी  भोपळ्याच्या  किसामधे     एकत्र   करा   मळून   घ्यावे  समजा     पाणी   लागले  तरच  घ्यावे  ह्याचे  थालपिठ  छान   लागते ..थालपिठ  लावताना  रुमाल  घ्या   रूमालाला  थोडा   पाण्याचा   हाताने   ओलसर  करावे  मग  थापावे ,तव्यावर थोडे तेल   पसरावे  नंतर थालपिठ  घालावे   वरति झाकण   ठेवावे  अंदाजाने झाले  का  ते  बघणे .    झाकण    काढून  थालपिठ उलटावे  वरून   परत  थोडे   तेल  सोडावे   आता  झाकण   ठेवण्याची   गरज  नाही ...इतर  थालपीठा  प्रमाणे   करावे..

सुनंदा
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

फुग्याची थालीपीठे

२वाटीगहु,२वाटी ज्वारी,३वाट्या तांदुळ,१/2वाटी चऩाडाळ,थोडे अख्खे उडीद,धने जीरे खमंग भाजुन दळून आणावे,थालीपीठे करताना लसुन हिरवी मीरची वाटून घालावी,हींग,ओवा ,कोथिंबीर घालावी ,पुरीच्या आकाराची करुन तळावीत चांगली फुगतात ,आपण थालीपीठे तळत नाही पण वेगळा मेऩू आणी एक दिवसाच्या सहलीसाठी उत्तम मेनू,मुलांना आवडतात ,त्याबरोबर लोणी किंवा लाल मिरची लसुन चटणी बरोबर पण छान लागतात,दुसरे म्हणजे नेहमीची थालीपीठे करताना पीठात पालक चिरून घातल्यावर पण चांगली लागतात

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment