मोईत़ो
(मला पुदिना जाम आवडतो,त्यातही लिंबासोबतच combination खासच)
साहित्य : उंच काचेचा ग्लास, पुदिन्याची पाने, लिंबाच्या पातळ कापलेल्या बारीक फोडी,पीठी साखर, लिंबू रस, बर्फाचा चुरा, थंड पाणी/सोडा आवडीप्रमाणे, लाकडी रवी/चमचा
कृती :
एका उंच ग्लासमधे तळाला लिंबाच्या फोडी आणि पुदिन्याची पाने हाताने च थोडी कुस्करून टाकावीत,त्यात २-३ चमचे पीठी साखर घालावी.
*लाकडी रवी/चमच्याने हे मिश्रण हळूहळू हलक्या हाताने कुटून घ्यावे, अगदी लगदा करु नये.
*यात एक चमचा लिंबू रस मिसळावा.
*बर्फाचा चुरा घालावा.
*थंड पाणी/सोडा मिसळावा अन् २ मिनिटे चांगले ढवळून घ्यावे.
आणि आरामात खुर्ची वर बसून आवडत पुस्तक वाचत... मधूनच दातांखाली येणारया पुदिना-लिंबूचा निवांतपणे आस्वाद घ्यावा.. 🍹
जयश्री खराडे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment