Monday, July 30, 2018

बकलावा

बकलावा

(तुर्कीश स्वीट डिश)

खूप दिवसांनी मैत्रिणी घरी येणार होत्या...
हे करू... ते करू... सुरू होत, तब्बेत थोडी तोळा-मासा सुरू होती, लाडू/जिलेबी/शाही टुकडा डोक्यात घोळत होतं, मग काही वर्षांपूर्वी ऐकलेल नाव आठवल
बकलावा..
चला मग तयारीला लागू अस म्हणत जवळच दुकान गाठलं...सगळयात महत्त्वाच लागणार साहित्य
फिलो शीटस् ( phyllow sheets- अतिशय पातळ पारदर्शक अशा रेडीमेड पेस्ट्री शीटस्) हव्या होत्या, पण इथे थीन क्रस्ट पेस्ट्री शीटस् available होत्या.. पहिला प्रयत्न याच्यावरच करायचे ठरवलं (आणखी दूर जाऊन आणण्याचे त्राण नव्हते.)
अर्थातच फिलो शीटस् मिळाल्या असत्या तर बात और थी..
पण..

साहित्य

२ कप साखर,१ कप पाणी, लेमन झेस्ट,काजू, बदाम, अक्रोड, पिस्ते भरड, पिस्त्यांची वेगळी भरड, वितळलेले अनसाल्टेड बटर आणि फीलो शीटस्(गोदरेज नेचर्स बास्केटमध्ये आरामात मिळतील,या फ्रोजन स्वरूपात असतात, घरी आणल्यावर फ्रीजर मधेच ठेवाव्यात, वापरायच्या आधी १ दिवस फ्रीजरमधून काढून फ्रीजमध्ये ठेवाव्यात आणि मग वापराव्यात.)

कृती

*) साखर आणि पाणी एकत्र करून पाक करण्यास ठेवावा. १० मिनिटे उकळल्यावर लेमन झेस्ट add करावी.
*) ओव्हन २००°c वर प्रिहीट करून घ्यावे.
*) फीलो शीट बेकींग ट्रेमध्ये पसरवून ब्रशने सढळ हाताने वितळलेले बटर लावून घ्यावेत,याच पध्दतीने ९ शीटस् एकावर एक लावता घ्यावेत.
*) नवव्या शीटवर बटर पसरल्यावर ड्रायफ्रुटस् ची भरड काठोकाठ पसरवून घ्यावी, साधारणपणे १/२" जाडीची असायला हवी.
*) पुढील स्टेपमध्ये २ पध्दतीने बकलावा करता येतो, हे ९ शीटस् व्यवस्थित अगदी घट्ट रोल करायचे आणि अशाच पध्दतीने रोल बनवून घ्यायचे...
अथवा ड्रायफ्रुटस् च्या थरावर आणखी ९ शीटस् लावून घ्यायचे.
*) ओव्हनमध्ये ठेवण्यापूर्वी आपल्याला हव्या त्या शेपमध्ये धारदार सुरीने कट मारून घ्यावेत.
* ) उरलेल बटर या कटस् मध्ये ओताव..
*) २००°c वर ३०-४० मिनीटे बेक करून घ्याव.
*) ओव्हनमधून बाहेर काढल्याबरोबर पाक यावर ओतावा..
चुर्..चुर्.. सही आवाज येतो..
*) साधारण तासाभराने सर्व्ह करू शकता.
*) सर्व्ह करताना प्रत्येट कापावर मनसोक्त पिस्त्याची भरड भुरभुरावी...
आणि रसस्वाद घ्यावा...आणि खाऊ घालावा..😋😋🤗🤗

जयश्री खराडे.

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment