🔷मिरची पाव K ,मोहरी येक वाटी ,धने चार चमचे ,मेथी येक चमचा ,जिरे येक चमचा ,सफेद तीळ येक चमचा ,मीठ ,हळद ,हिंग ,तेल
मिरची धुऊन उभे दोन तुकडे करावे .कढई मोहरी धने जिर् तीळ ।क्रमाने भाजावे .दोन चमचे तेल टाकून मेथी ,हिंग तलावे मिक्सरला जाड्सर वाटावे .मीर्चीला मीठ हळद वाट्लेला मसाला लावावा .दोन वाटी तेलात मोहरी हिंग घालून फोडणी करावी .गार झाल्यावर मिर्चित घालून लोणचं येकत्र करावे .
वैशाली मोजरकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷कच्ची करवंदं , लोणच्याचा मसाला तयार घरचा असेल तर ऊत्तम .मी घरी मेथी १च तळून घेते पूड करते .त्या त मोहरीची पावडर २चमचे तळलेला हिंग१/२च पावडर करून तिखट हळद घालते .मसाला तयार झाला .
कृती
करवंदे ,चेचून घ्यावी . त्याचा चीक जाण्यासाठी मीठाच्या पाण्यात टाकली तरी चालतील .
बिया काढाव्यात . लोणच्याचा मसाला भरून करवंदे .हलवून घ्यावीत .
वरून मोहरीची खमंग फोडणी द्यावी . मुरलं ४दिवस की छान लागतं .
लोणच्याचा मसाला
मेथी २चमचे ,१वाटी मोहरीची डाळ,१/२वाटी ,१/४वीटी हळद ,हिंगपूड कुटलेली पूड४चमचे ,मेथ्या २चमचे .
कृती
मेथ्या व हिंग तळून बारीक कुटावे .
त्यात मोहरीची डाळ, तिखट हळद,हिंग मेथी पूड गातली की मसाला तयार.
कायरस ही करता येईल करवंदाचा .काकडीच्या कायरसा सारखाच . गूळ जास्त घालावा करवंदे ठेचावी .मीठाच्या पाण्यात करवंदे टाकली तर चीक निघून येतो
डॉ.वृंदा कार्येकर पुणे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment