बाळंतिणीचा आहार
बदाम ,खसखस रात्री भिजत घालायची. सकाळी बदामाची साल काढुन बारीक वाटायचे, खसखस ही बारीक वाटायची. पातेल्यात १ चमचा तुप घालून वरील मीश्रण परतून त्यात हवे तेवढे दुध ,साखर घालून ऊकळणे वेलची घालून तयार करून ती बाळंतीणीला देणे
रोहिणी जोशी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷बाळंत झाल्या तिसऱ्या दिवशीपासून पुढे ३ दिवस खसखस ची खीर जी इथे कुणीतरी लिहिली आहे,मग पुढे ३ दिवस डिंक ची खीर (खसखस च्या जागी डिंक तुपात परतून वाटलेला)मग पुढची ३ दिवस आळीव ची खीर, आळीव किंचित तुपात परतून दुधात २ तास भिजवून केलेली खीर...
पुढे ३ दिवस खारकेची पूड ची खीर..
हा सकाळचा पहिला नाष्टा जो पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान द्यावा..
हे खाऊन बाळंतीणने ताणून झोप घ्यावी..
असे १५ दिवस पाहिले निरामय गेले की आई ला शक्ती येते आणि बाळाला भरपूर दूध...
यात खीर आणि दिवस जसे सांगितले त्याच पद्धतीने द्यावे,क्रम चुकवू नये😁😁
पिढीजात चालत आलेला क्रम आहे हा
खोबऱ्याची, लसणाची चटणी भारी लागते बाळंतिनीच खाणं (ती खाऊन उरलं की आमच्या वाट्याला येणार) खायला मज्जा येते
भार्गवी दीक्षित
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷जायफळ सिद्ध करून बाळाला गुटितून देणे
कृती
ताजे दूध तापवुन थंड करणे त्यात जायफळ ८ तास भिजत ठेवणे
त्यातुन काढून दह्यात ८ तास
भिजत ठेवणे
त्यानंतर लोण्यात ८ तास
शेवटी तुपात ८ तास
बाळगुटी साठी जायफळ तयार.
अनघा भिडे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷मेथीच्या काडयांना (ज्या आपण टाकून देतो)भाता बरोबर कुकर ला लावून त्या शिजवून घेयच्या. मग ते मिक्सर ला लावून पेस्ट करून त्यात हवं तेवढे पाणी घालून गाळून घेयचे. मग त्यात लागेल तशी तूप-लसूण-जीर्याची फोडणी घालून मस्त उकळी आणून शिजवायचं. बाळंतीणीला गरम गरम भाकरी बरोबर कुसकरून अथवा मऊ भाता बरोबर खायला द्या..खूप चवदार लागतं.
रेणुका
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷भाता चा कुकर लावतो.त्या वेळी मेथीच्या काड्या कुकरमध्ये लावल्या तरी चालेल . एका भांड्यात मेथीच्या काड्या घेऊन ३/४वाट्या पाणी घालून च (स्वच्छ धुऊन कुकरला लावा नंतर )कुकर मधून काढल्यावर त्याचे पाणी गाळून घेणे व तुपाची फोडणी त फक्त लसूण व खोबरे फारच बारीक करून मीठ घालून सुप तयार.. बाळंतीनीला व इतर कोणालाही हे सुप म्हणून पिण्यासाठी चांगले आहे ....महत्त्वाचे म्हणजे खोबरे ओले किंवा सुके कुठलेही चालेल....
सुनंदा शिंदे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷पहाटे भरपूर तूपाच कणकेचा शिरा, दुपारी पालक, शेपू ची भाजी, भरपूर तुपाची पोळी, सायंकाळी एक ते दीड मूठ हातसडीच्या तांदुळाचा भात,( हा तांदूळ सकाळी भिजवून ठेवावा लागतो किमान ८ तास भिजला तरच मऊ शिजतो, यात 4 पट पाणी मावते) एकदीड वाटी दूध...
कुणी लोक पाहिले ५ दिवस सटवाई ची पूजा करे पर्यंत बाळंतिणीला जेवण देते नाहीत, मग पाचवीच्या पूजे पर्यंत फक्त कणकेचा दुधात शिरा, आणि कणकेचा किंवा भाकरीच्या पिठाचा उपमा..तिन्ही वेळा हेच..
हे बनवण्याची पद्धत वेगळी आहे, खूप जास्त तूप म्हणजे एक छोटी वाटी तूप तर त्याच वाटीने कणिक, गूळ घालून असतो हा शिरा अगदी ६,७ घास होतो)
शेपू भाजी आणि मुखवासात बालशेपा, खोबरं, ओवा घातलेला पान..
Calcium भरून काढत सगळं..
भार्गवी दीक्षित
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷या खिरी मध्ये साखर ऐवजी गुळ वापरावा
* बाळनतिणीला साखर , दूध, तूप असेच पदार्थ खाऊ घेतले जतात
* त्याचा परिणाम म्हणून पुढे शुगर होते,वजन वाढत
* आपण जे खातो त्याचीच साखर होत असते
* आणि बाळाला पौष्टिक दूध कसं मिळणार
* एक वेळ ड्रायफ्रुईट्स द्यावेत
* रोजच्या जेवणात प्रोटीन असलेले पदार्थ नक्की द्यावेत
* सगळ्या भाज्या, उसळी, डाळी, भाकरी, सलाड हे द्यावं
* अन्न ग्रम व ताज असावं
* विशेष म्हणजे स्त्री ने डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरपी , हलके व्याआम करावा
* मुलाला 6 महिने फक्त आईचंच दूध द्यावं
* कारण आई ने सगळं पौष्टिक खाल्लं तर दूध सत्वयुक्त असेल
* बाळ पण तंदुरुस्त राहील
एक्स्ट्रा साखर , तूप अजिबात देऊ नये
शेकशेकोटी या पेक्षा पण जरुरीचे आहे तिने योगासन करावं
वैजयंती जोशी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷कोकणात पहिल्या ५ दिवस तूप भात मिरी पावडर देतात.
ममता संसारे अन्नपूर्णा: ५व्या दिवशी अंडयाचे सांबारे व भात नंतर व्यवस्थित जेवण चालू करतात
ममता संसारे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷मी रोज एक भाकरी आणि भाजी रात्रीच्या जेवणात खायची.
त्यामध्ये पोकळा;मेथी;तांदूळजा असायची.
दुपारी गरमागरम मऊ तुपभात
सकाळी दुधात भिजवलेली ज्वारीच्या दोन भाकरी...
नाष्टा रव्याची खीर
सविता काइंगडे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷मिरी आणि खोबरे घालून चटणी करतात तूप भात चटणी
अंड्याचा रस्सा तूपावर फोडणीला टाकतात.
विद्या शेट्ये
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷कोकणात बाळंतिणीला उकडे तांदूळ, हलीम, सुकं खोबरं, गूळ, आणि आपल्यास हवे असल्यास बदाम घालून पेज देतात खूप छान लागते हि पेज👌👌😋 जेणे करून बाळंतिणीला कमरेचा त्रास होऊ नये म्हणून हि पेज देतात
तसेच सकाळी नास्ता करण्या आधी ओवा, गुळ आणि सुकं खोबरं देतात खायला
हलीम म्हणजे नक्की सांगता येत नाहीय मला पण तो बेसन मेथी चे जे लाडू बनवतात त्यातही घातला जातो हलीम
हलीम खूप गरम असतो.
सुचेता दरपे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷रव्याची कणेरी, मेथीची रसातली खीर /आटवल दररोज द्यावी असं माझ्या आईने सांगितलंय. तसंच खसखस रात्री भिजत घालून सकाळी अंड्याची भुर्जी करतो ना तशी खसखशीची भुर्जी करुन देऊ शकता. उकडलेले अंडे, आमलेट बनवून देऊ शकता. मासे खात असल्यास जेवणात मांदेळी, मुडदूशा (नगली), लेपा, बोंबिल ह्या माशांची आमटी द्यावीआणि एक दिवस ओवा व खोबरे वाटून तर दुसरे दिवशी मिरी व खोबरे वाटून केलेली सोलकढी पण बाळंतीणीला द्यावी असं आई म्हणते.
प्रीती कामत
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷नाचणीचे लाडू , भाकरी ,आंबील ----एक--४वाट्या पाणी घेऊन १/ते१ - ,अंबोळी, एक ते दोन चमचे नाचणी पिठ घेऊन त्या पाण्यात चांगले मिक्स करा त्याची गुठळी होणार नाही .मग गॕसवर पातेले ठेवून उकळून घ्यावे ..नकळत मीठ घालावे .. ह्यात आवडीप्रमाणे गुळ घालून परत जेवढे लगेच प्यायला पाहिजे असेल तेवढे गरम करून थोडी वेलदोडे पूड व दुध घालून प्यावे.
🔷दुसरी पध्दत
पहील्या कृती प्रमाणे च पीठ शिजवून घ्या ..नंतर ताक करून ताकात पुदीना पाने ,आवडीप्रमाणे चिरून किंवा मिक्सरवर बारीक करा.. हिरव्या मिरच्या बारीक चिरून ,कोथिंबीर सुद्धा आवडीप्रमाणे अंदाजाने घ्या धुऊन बारीक चिरुन व लसुण आवडत असेल तर तो सुद्धा जेवढा बारीक चिरता येईल तेवढा चिरून घ्यावा ..आता फोडणी करून वरील सर्व पदार्थ फोडणी त घालून चांगली खमंग फोडणी करून ताकाला द्यावी आणि नाचणीपिठ आपण आधीच शिजवून ठेवले आहे ते ताकात मिसळून घ्यावे .चवीनूसार मीठ घालून आंबील पिण्यासाठी तयार
सुनंदा शिंदे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷आम्ही भावंड त्याला गोट्यांची वरणफळ म्हणायचो
वरण करताना आत्या लसूण,लवंगी हिरवीमिरची,दाणे आणि दोनतीन काजूचे तुकडे,आल असा मसाला वाटून घेत असे
आई त्यात दाण्याचकुट,मिरची,मिरे,आणि लवंग, आल,घेई बाकी दोघींच्या चवीत फरक पडायचा पण मस्त लागायच
हे तीन प्रकाराने करता येतात
१)मोदकाप्रमाणे प्रमाणे उकड काढून नंतर तेलात चण्याचीडाळ,खोबर,कोथिंबीर घालून परतून घ्यावे परतून घेऊन
किंवा तळून चटणी बरोबर खाता येता.
२) उरलेल्या भातात आल हिरव्या मिरचीची पेस्ट घालून भसत मऊ पर्यंत दुधात परत शिजवून घ्यायचा.त्यात गोळा करता येईल इतपत तांदळाचे पीठ, हिंग,कोथिंबीर घालून गोळे करून ते वाफवून घ्यावे.नंतर परतावे अथवा तळावे.तसे करायचे नसेल तर वरणाबरोबरही खाता येतात.
३)तांदळाच्यापीठाची उकड काढताना पाण्यात गुळ,खोबर ,वेलचीपूड,घालून गोड ही करता येते
हा पदार्थ तिखट जास्त चवीष्ट लागतो.
डॉ.तृप्ती लोणकर
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment