Saturday, July 28, 2018

रायता

🔷बुंदी रायता

एक वाटी दही पाणी न घालता घुसळून घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ, साखर व बारीक चिरलेली कोथिंबीर , मिरची पावडर एकजीव करून घ्यावे. त्यात अर्धी वाटी खारी बुंदी घालून एकत्र करावे

मंगला डोंगरे

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷मुळ्याचे रायते

मुळा किसुन घ्यावा, त्यात गोड दहि, चवीपुरती साखर, सैधव मीठ कोथिंबीर बारीक चिरुन घालावी, राई, कढीपत्ता फोडणी करुन घालावी, फोडणी त थोडिशी मिरची पावडर घालावी.

वंदना मंकिकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷दही रायता

दही पाणी न् घालता फेटूंन् घेणे मीठ किंचित साखर घालणे वरुन तूप हींग जिर मोहरी सुखी लाल मिर्चिची फोडणी देणे दही रायता तयार.

ममता संसारे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷कच्चा केळ्याचे रायत

कच्ची केळी कुकरमध्ये उकडुन घ्यावीत,  साल काढून केळी कुस्करून घेऊन त्यात दाण्याचं कुट, दहि, सैधव मीठ, मिरची बारीक चिरून, कोथिंबीर, साखर सगळं व्यवस्थित मिक्स करून  त्यावर राई, हिंग कडिपत्त्याची फोडणी द्यावी.

वंदना मंकीकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

पिकलेल्या केळ्याच रायत

          लाल मोहरी थोड़ा वेल पाण्यात भिजवून पाणी काढून मिरची बरोबर वाटायची मीठ दही घालायचे.

ज्योती खांबेटे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷पेरुचे रायते-

पिकलेला पेरु
गोडसर दही
मीठ,
साखर,
हिरवी मिरची
- पेरूच्या आतील बी काढून बारीक चिरून घ्या. त्यात मीठ, साखर, हिरवी मिरची चिरून घालणे. थंड दही घालून मिसळून खाणे.

- गीतांजली देगावकर

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🔷अननस च रायता

अननस बारीक फोडी करून मायक्रोव्हेव का किवा थोडं पाणी घालून गॅस वर थोडा शिजवून घ्यावा
गार झाल्यावर त्यात दही,मीठ, साखर,बारीक चिरून मिरची कोथिंबीर घालून फ्रीज मध्ये ठेवून थंड घ्यावे

🔷कांद्याच्या पातीच रायता

हिरवी गार पात, कोवळी पाने खुप बारीक चिरून घेणे
ओला खोबर,थोडी चिंच,हळद, मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे
त्यात बारीक चिरलेली पात मिक्स करून हवं असेल तर किंचित लाल तिखट घालावे

अंजली जोशी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

बीट बटाटा रायते                  

२मध्यम आकाराचे बीट १ बटाटा मध्यम आकाराचा बीट आणि बटाटा मध्ये कापून कुकरमध्ये उकडून घ्यावा गार झाल्यावर त्याची साले काढून बीट किसणीवर किसावे किंवा हाताने कुस्करून घ्यावे त्या फेटलेले दही मीठ साखर चवीप्रमाणे मिरपूड घालावी हिरवी मिरची बारीक चिरून घालावी मग सर्व चांगले मिक्स करावे मस्त चविष्ट रायते तयार .                        

टिप - सांडगी मिरची तळून कुस्करून घातली तरी छान लागते.

अर्चना जोशी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

केळाचे रायते

४ केळी
४ चमचे दही
४ चमचे शेंगदाण्याचा कुट
कोथिंबीर
मीठ
साखर
मध

कृती

पिकलेल्या केळीचे गोल काप करुन घ्या त्यामध्ये दही, शेंगदाणे कुट, मध, साखर, चिमूटभर मीठ, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे घालुन मिक्स करावे व खायला द्यावे.

वैशाली वेटाळे

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment