(इन्स्टंट) तात्काळ वापरायचे तक्कू..
हे २-४ दिवसात सम्पवायचे..
कैरी
तिखट
मीठ
हळद
भाजलेल्या मेथ्याची पूड
जिरेपूड
हिंग जिऱ्याची फोडणी
कैरी स्वच्छ धुवून साल काढून घ्या
नंतर कैरी जाड खिसनीने खिसून किंवा (काकडी चोचतो) तसे घ्या त्यात चवीप्रमाणे हळद,तिखट,मीठ, भाजलेल्या मेथीची पूड, जिरेपूड घालून मिसळून घ्या
त्यावर जेंव्हा खाणार आहे तेंव्हाच गरमगरम जिरे हिंगाची फोडणी घालून घ्या..
फक्त एकवेळ पुरतं तोंडीलावन म्हणून वापरताना त्यात कोथिंबीर घालून तर कधी एकदम बारीक चिरलेला कच्चा कांदा घालून पण खाता येत..
भार्गवी दीक्षित
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment