Monday, July 30, 2018

बारधानी धपाटे

बारधानी धपाटे

बाहेर पावसाची रिपरिप ,चिडचिड नि रस्त्याचे चिकलठाण जाणायेणारा रेंद्याची रंगपंचमी करून जाई मातकट डाग आओले कपडे शेंडी ते तळवंडी भिजजलेलो.झोंबणारा वारा व बोचरा गारवा
ओल्याने उंबर्यात गेल्याबरोबर तिखट खरपूस वास नाकाला आरपार झोंबला .गारठा थंडावला नि ओलावा विरघळला.तसा आत गेलो .
कपडे काढून धू .वलनिवर टाक हाडकतील  जा .घर ओलं नको करू .
आज बारधानी धपाटे न् चिंच गुळाचं पाणी केलंय .जा चुलीपुढं शेकत खा गरमगरम .
आता धपाट्याच्या सुगंधाने थैमान नि पोटात  भुकेने उच्छाद माडला होता आता मात्र राहावेना .टोपल्यात बसून खावे की काय असे झाले .
बारधानी धपाट्याची तिच्या हातची काय चव होती माहीत नाही पण आजही कायम जिभेवर  तरळते .

बारा धान्ये ते बारधानी

समप्रमाणात चना डाळ,मूग डाळ ,मसूर डाळ ,उडीद डाळ , थोडी तूर डाळ ,ज्वारी ,बाजरी ,नाचणी ,गहू ,तांदूळ नाचणी ,हिरवे मूग ,मका ,धने ,मेथी बी  इ.
आडमधडम भाजून भाजणी तयार .
भाजणी ,एक बारीक चिरलेला कांदा ,भरपूर ठेचा चिमूटभर लाल तिखट, वोवा पावडर ,हळद, हिंग ,आमचूर पावडर किंवा लिंबू सत्व किंवा लिंबू  चवीनुसार मीठ ,भरपूर कोथिंबीर ,या मिश्रणावर तीनेक चमचे तेल  घट्ट मळून पंधराएक मिनिटे ठेवून .
भिजलेल्या चिंचेत गुळ मिसळून एकजीव करून तापल्या तव्यावर चमचाभर  साजूक  तूप टाकून जिरे मोहरी हिंग  कढीपत्ता कडकडून चिंचगुळाच्या पाण्यात टाकून चवीसाठी मीठ टाकल्यासारखे करावे याच तव्यावर धपाटे भाजावेत
एक अवसानातला गोळा पोळपाटावरच्या  ओल्या फडक्याला  तेलाचा हात लावून चार बोटांच्या कौशल्याने गोल थापावेत .थापलेल्या धपाट्यावर  मध्यभागी व चिर ठिकाणी बोटाच्या टोकाने पाच खिडक्या करून हळूच उचलून तव्यावर टाकून चोहोबाजूंनी तेल फिरवून झाकण ठेवावे मध्यम आचेवर एक अंग भाजल्यानंतर उलटू दुसरेही खरपूस  भाजून धपाट्याच्या पोटावर लोण्याचा लिंबाएवढा गोळा ठेवून चिंच गुळाचे पाणी तोंडी लावायला द्यावे
आज बालपणी आईने मारलेले व प्रेमाने पोटावर खाऊ घातलेले धपाटे आजही आठवणींची चव ताजी करतात

काकासाहेब वाळुंजकर

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment