Monday, July 30, 2018

लेख-लसूण

🔺लेख- लसूण🔺

तृप्ती लोणकर

आपल्याला माहित असलेला उग्रवासाचा कंद म्हणजे लसूण हा लसूण अत्यंत औषधी आणि गुणकारी आहे.अगदी हृदय रोगपासून ते पोटात होणारा गॅस पर्यंत. लसूण उपयोगी असतो.त्याने पदार्थाला चव तर येतेच पण माणसाला वात विकारा पासून. दूर नेणाऱ्या लसणाची गोष्ट अत्यंत रोचक अाहे
               होय गोष्ट,कथा काहीही म्हणा.लसूण हा अमृतगुणी मानतात.सर्व साधारणपणे अमृत म्हटले की गोड,मधुर,असे शब्द आठवतात.मग लसूण या प्रकारात येत नसताना अमृतगुणी कसा
              त्याचे असे आहे.एकदा देवांचा राजा इंद्र आणि त्याची पत्नी गप्पा मारत मारत अमृत प्राशन करीत होते.त्या ओघात शचीदेवीनी जरा चार पच घोट अमृत जास्तच प्राशन केले.आधीच शचीदेवी नाजूक त्यातून अमृताचे अतिपान झालेले.
               त्यांचे पोट बिघडले.त्यांना अतिसार आणि वमन (म्हणजे उलट्या आणि जुलाब) होऊ लागले.
     त्या अतिसारा पेक्षा वमनाने त्या हैराण झाल्या होत्या. त्यांना होणाऱ्या वांत्यांची उबळ तेवढी जोरात होती की ते पाणी स्वर्गातून थेट पृथ्वीवर उडे.त्यावेळी त्याचे थेंब ज्या भागात पडले त्या भागात लसूण उगवलेला होता त्यावर अमृत पडल्याने तो अमृतगुणी झाला पण उलटीवाटे अमृत पडले म्हणून उग्रदर्प त्याला येऊ लागला.
अशी ही लसणीची निर्मिती पृथ्वीवर झाली.
               
तृप्ती लोणकर

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment