कोबीचे दूध घालून केलेले सूप
साहित्य
1. कोबीचे चिरून घेतलेले तुकडे
2. लसणाच्या तीन/चार पाकळ्या
2. एक हिरवी मिरची
3. मिरपूड
4. मीठ
5. कोथिंबीर
कृती
१. कोबीचे तुकडे, हिरवी मिरची आणि लसणाचे तुकडे उकडून घ्या.
२. उकडल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. वाटताना त्यात कोथिंबीर टाका.
३. वाटलेले हे मिश्रण एका भांड्यात टाका. त्यात चवीप्रमाणे मीठ टाका.
४. भांडे गॅसवर ठेवून उकळू द्या. त्यात चवीप्रमाणे मिरपूड टाका.
५.. गॅस बंद करा. सूप पिण्यासाठी तयार!
टीप:-
कोबीऐवजी फ्लॉवर/मशरूम/दुधी भोपळा/लाल भोपळा/पालक यांचाही वापर करता येईल.
डॉ. वसंत काळपांडे
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment