Tuesday, July 24, 2018

पौष्टिक व आरोग्यावर्धक सरबत

🔷पौष्टिक व आरोग्यावर्धक सरबत🔷

या अतिशय पौष्टिक व आरोग्यवर्धक सरबतात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ‘ए’ व ‘सी’ असून हे एक उत्तम ऍंटीऑक्सिडंट असून यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ति वाढवते .कॅलेस्ट्रॉल कमी करते ,रक्तदाब नियंत्रित करते,उत्साह ,ताकत, जोम, जोश,तरतरी,व स्फूर्ती वाढवते असे बहुसंख्य फायदे हे सरबत नियमितपणे घेतल्यास मिळू शकतात. हे सरबत करायलाही अत्यंत सोपे आहे.

साहित्य :

एक ताजे लालबुंद गाजर ,एक काकडी,एक बिटाचा कांदा,एक लालभदक टोमॅटो,२-३ वाट्या कालिंगडाचे छोटे छोटे तुकडे,अर्धी वाटी डाळींबाचे दाणे, ७-८ स्ट्रॉबेरी,१०-१२ काळी द्राक्षे,एक चमचा लिंबाचा रस,चिमूटभर सैंधव मीठ,७-८ बर्फाचे क्युब्स,क्लब सोडा,जिरेपूड.

कृती :

आगोदर गाजर,काकडी व बीट तीनही सोलून व किसून ठेवा,टोमॅटोच्या चिरून बारीक फोडी करून ठेवा. कालिंगडाच्या आणतील लाल गराचे छोटे छोटे तुकडे करून ठेया.डाळिंबातील दाणे काढून ठेवा, स्ट्रॉबेरीचे छोटे तुकडे चिरून ठेवा. 
आता सरबत करण्यासाठी मिक्सरच्या ब्लेंडरच्या भांड्यात गाजरचे तुकडे , काकडीचे तुकडे, बिटाच्या छोट्या फोडी, कालिंगडाचे छोटे छोटे तुकडे, वाटी डाळींबाचे दाणे, स्ट्रॉबेरीचे छोटे तुकडे, १०-१२ काळी द्राक्षे,लिंबाचा रस व चिमूटभर सैंधव मीठ एकत्र घालून ब्लेंड करून घ्या व ज्यूस एका सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून घ्या.
ग्लासमधून सर्व्ह करतेवेळी सरबतावर थोडेसे सैंधव मीठ व जिरेपूड भुरभुरा व २-३ बर्फाचे क्युब्स घालून सर्व्ह करा.

🔷कैरीचं पन्ह🔷

आपण नेहमी पितो.
पण कैरीची चव फक्त लोणचं किंवा पन्ह्या ऐवजी आणखी कुठे घेता येईल म्हणून नेट वर शोधताना एका ब्लॉगवर कैरीच्या सरबताविषयी वाचलं..

साहित्य-

कैरी, साखर, वेलची पावडर, मीठ

कृती-

कैरी सोलून आतला पांढरा गर घ्या. त्यात २-३ चमचे साखर आणि थोडंस मीठ घाला.
चव येण्यासाठी वेलची पूड घाला. (केशर वगैरे सुद्धा चालेल.)

आता हे मिश्रण मिक्सरमध्ये ३-४ मिनिटं वाटून एकजीव करून घ्या.

आणि थंड पाणी घालून कैरीचं सरबत तयार.

सोपी कृती, शिजवणे वगैरेचा वेळ वाचतो आणि चव..

ती तुम्ही चाखून बघवीच अशी..

चंदन तहसीलदार
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

गुलाबाचं सरबत

२५० ग्रॅम गावठी गुलाबाच्या पाकळ्या, २०/२५ पुदिन्याची पाने, २०/२५ तुळशीची पाने, वेलची,२०० ग्राम साखर

२ लिटर पाणी गरम करावे, पाण्याला उकळी आली की धुतलेल्या गुलाबाच्या पाकळ्या त्यात घालून गॅस बंद करावा,
झाकण ठेवावे व दीड ते दोन तास ठेवून द्यावे
तोपर्यंत पुदिना व तुळशीची पाने डिड इंच आले घालून मिक्सरला बारीक करावे, त्यात ग्लासभर पाणी घालून 5 मिनिटे थोडे शिकवून घ्यावे.आता गुळाच्या पाकळ्यांचा छान रंग पाण्याला आला असेल, पाकळ्या पाण्यात निथळून घ्यावत, पुदिना आणि तुळशीचे मिश्रण गळून त्यात एकत्र करावे.आता एकत्र मिश्रण मंद गॅसवर ठेवावे, त्यात साखर व वेलची मिसळावी.एकतारी पाक तयार झाल्यावर गॅस बंद करावा, हे CONCENTRATE तयार झाले, फ्रीझ मध्ये बाटलीत भरून ठेवावे.१:३प्रमाणात पाण्यात मिसळून इस चुबे घालून पिण्यास द्यावे, उन्हाळ्यात खूपच उपयुक्त आहे

शिल्पा कापुरे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

मॅप्रो - रोझ पासून बनवलेले सरबत -

ग्लासभरून थंड दूध घ्या, २ चमचे सरबत घाला.मस्त फ्लेवर्ड मिल्क तयार.बर्फ किसून घ्या,पेल्यात भरा,त्यात कुल्फी स्टिक रोवा,बर्फ गोळा बाहेर काढा.त्यावर मॅप्रो सरबत ओता.
गोळा तयार😄

सुचिकांत
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

टरबुजाचे सार्बे

टरबुज कापून, बिया काढुन घ्याव्या . त्याचे तुकडे मिक्सरमध्ये साखर चवीनुसार टाकुन फिरवावे . हे मिश्रण फ्रिजर मध्ये ठेवा .१ तासाने काढुन पुन्हा मिक्सरमध्ये फिरवा .२-३ तासांनी सेट झाल्यावर स्कुपने काढुन खायला दया.अश्याच प्रकारे खरबुज, सिताफळ, कैरी, आंबा इ वापरून बनवू शकतो.

   पूनम जावळे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

१वाटी डालिम्ब दाने
१ मोसंबी
१संत्र
सगळ्याचा रस काढणे
चवी पुरते मीठ घालणे
काळी मिरी पावडर घालणे
सरबत तयार
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

थंडाई कुल्फी

अर्ध्या लिटर कोमट दुधात 50 ग्राम खावं घालून 100 ग्राम साखर घालावी.नंतर त्यात दोन चमचे (टेबलस्पून) थंडाई concentrate घालावे.कुल्फीच्या साचत भरून freezer ला लावावे,मावा कुल्फी तयार!

शिल्पा कापुरे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

आम पन्हा
कच्ची कैरी
 
एक हिरवी मिरची फक्त खालचा टोका कडचा तुकडा
पुदिना
मीठ चवीपुरत,साखर
काळ मीठ

कृती   
          कैरी उकडून तिचा गर काढून घ्यावा. कैरीचा गर,साखर,मिरची,पुदीन्याची पाच,सहा पान सगळ मिक्सर वरून काढून घ्याव
या पल्प मधील दोन चमचे पल्प ग्लासवर पाणी आणि चवीपुरते मीठ व काळमिठी घालून आम पन्हा तयार कराव.
आपण नेहमी करतो त्या पन्ह्यापेक्षा वेगळी चव घेवून पहा.

डॉ.तृप्ती लोणकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

शरबती मुलाकते-

कॉलेजला सुट्टी लागलेली असते आणि तिला तरीही भेटायचं असतं, पण अजून आपल्यात काही नाही मग तिला बोलवायचं कसं? कॉफीला येशील का? शी! सगळेच विचारतात असलं! तिने इम्प्रेस व्हावं म्हणून काहीतरी स्पेशल करायचं. जरा हटकेच! असा विचार करणार्या कॉलेज युवकांकरता एक भारी सरबत कल्पना. कॉफीला नका बोलवू. क्रिमी सरबताला येत्येस का असं विचारा.
आता हटके क्रिमी सरबत बनवा. कसं? असं👇

२ मलाईवाली शहाळी,  व्हॅनिला आईस्क्रीम आणि संत्र्याचा रस १कप, नारळाचे दूध २ कप

कृती:

एका शहाळ्याची मलाई, एका शहाळ्याचे पाणी आणि नारळाचे दूध एकत्र ज्युसर मध्ये फिरवून घ्या. मलाई अगदी मऊसूत क्रिमी व्हायला हवी.

आता हे बाजूला ठेवा आणि दुसऱ्या शहाळ्याचे पाणी आणि व्हॅनिला आईस्क्रीम घ्या फिरवून ज्युसर मधून.

संत्र्याच्या रसात एका शहाळ्याच्या मलाईचे बारीक तुकडे घाला.

मस्तपैकी  दोन उंच काचेच्या ग्लासांत तळाला व्हॅनिला मिश्रण, मग संत्रे मलाई, मग शहाळे नारळदुध अशी छोटी छोटी   लेयर्स द्या.
वरून एक व्हॅनिला आईस्क्रीमचा  लपका टाका (ती गोड खाण्याची शौकीन असेल तर) नाहीतर तुळशी आणि पुदिना पानांच्या बारीक तुकड्यांनी सजवा.

मग फ्रीजमध्ये तासभर ठेऊन सेट करा. आणि ती आली की तिला देऊन आणि छान बोलून आपलं नातं पण सेट करा.

काय म्हणताय? लग्न झालं आहे? हरकत नाही, तरीही  एकदा क्रिमी सरबत तारखेवर बोलवाच आपल्या जोडीदाराला.

© दीप्ती पुजारी

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment