Monday, July 30, 2018

सुके मासे-जवळा, करंदी, खेकडा...

करंदी भात

करंदी निवडून घ्यायची.भांड्यात मस्त तेल गरम करायचे त्यात 2 कांदे कापून फोडणी द्यायची.5 ते6 लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या.1 टोमॅटो ,हळद,मीठ आणि मालवणी मसाला घालायचा मस्त परतून घ्यायचे.त्यात निवडलेली करंदी घालायची.थोडावेळ झाकून ठेवायचे.नंतर तांदूळ धुवून त्यात टाकायचे मस्त परतून घेऊन त्यात हवे तेवढे गरम पाणी टाकायचे .आणि झाकण लावून मस्त शिजवायचे.झाला करंदी भात

जवळा

एक चाळणीत हा जवळा घ्या थोडा पाण्याखाली धुवा ,पाणी पूर्ण निथळू द्या.आता पसरत तव्यावर किंवा कढईत थोडे तेल घ्या.त्यात एक साधा कांदा मस्त परता. त्यात 4 ते5 लसूण पाकळ्या ठेचून घाला.पात असेल तर त्याचा कांदा आधी घाला(सफेद भाग) .एक टोमॅटो घाला चांगले परता. मग हळद,कांदा लसूण मसाला आणि मीठ घालून मंद गॅस वर शिजू द्या मग वरील जवळा घाला आणि उरलेली हिरवी पात घाला. मस्त एकजीव होऊ द्या म्हणजे परता. मंद गॅस वर थोडे झाकण लावून वाफेवर शिजवा.2 ते 3 कोकम घातले तरी चालतात.झाला जवळा

दीपाली पावस्कर
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

५खेकडे 🦀शिजवून आतील मांस काढून घ्यायचे, २कांदे बारीक चिरून तेलात परतायचा रंग गुलाबी झाला की त्यात आले-लसूण पेस्ट,आणि १छोटा टोमॅटो बारीक चिरून घाला,१ चमचा लाल तिखट, हळद अर्धा चमचा आणि आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा चिकन/मटण मसाला घाला थोडा वेळ परतून तेल सुटू लागले की खेकड्याचे मांस घालून एकजीव करा मीठ चवीनुसार घाला पण खेकडे शिजवताना मीठ घातले असेल तर मीठ चाखूनच घाला आणि वरून कोथिंबीर घाला👍

राखी कोळी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

रेणव्याचे सुके

माझ्या माहेरी-आजोळी या पद्धतीने मासे शिजवतात.

साहित्य

मासे,हळद,मीठ,सुके खोबरं, लसूण,कोकम,कढीपत्ता
कृती:
रेणव्या (मुडदुशा) मासे धुवून हळद,मीठ ( अर्धा चमचा ),मसाला लावून ठेवणे. २ चमचे सुके खोबरे किसून भाजलेले + ७-८ लसूण पाकळ्या वाटणे. हे वाटण, कोकम, थोडे पाणी,मीठ माश्याना लावणे. तेलात कडिपत्ता, त्यावर एक-एक मासे अलगद ठेवून आणि थोडे पाणी शिजायला ठेवणे. छोटे मासे पाच मिनिटात शिजतात ( रेणव्या,मोदकं, मांदेली) मोठे मासे (पापलेट,रावस,सुरमई,हलवा,करली, बांगडा,जिताडा,सौंदळ) ८-१० मिनीटात शिजतात.

सीमा दळी
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

बोंबलांचं सुकं

*बोंबील चांगले धुऊन घेणे .
*हळद , मीठ ,लाल मसाला, कोकम मॅरीनेट करायला ठेऊन द्यावे अर्धा - पाऊण तास.
*सुकं खोबरं आणि लसूण यांचे वाटण करून घेणे.
*मॅरीनेट केलेल्या माश्याला वाटण ( खोबरं आणि लसूण ) लाऊन ५मिनिटे ठेवावे . एक पसरट भांड्यामध्ये ( लगडी ) तेलावरती लसूण ठेचून फोडणीला टाकावी , नंतर थोडा मसाला आणि वाटण लावलेले मासे अलगद एकेक करून लावावे.
*उरलेले वाटण वरतून टाकावे , थोडेसे मीठ वरतून भुरभुरावे , झाकण टाकून शिजू द्यावे . *बोंबील लवकर शिजतात .

महत्वाचं-एकदा मासा शिजायला घातल्यावर त्याला हलवू नये.

अमृता शेट्ये

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment