Saturday, July 28, 2018

लेख-पोळी

मराठी माणसाचा पोळी भाजी हा अगदी मऊ कोपरा असतो.एखादा दिवस तो त्या पदार्थापासून दूर राहू शकेल पण जर महिनो न् महिने  त्याला दूर राहण्याची वेळ आली तर अवस्था बिकट होते
              मी शिकण्यासाठी बाहेरच्या देशात असताना अशीवेळ नेहमीच येत असे.त्यात मी म्हणजे केवळ गवत खाणारी.त्या मुळे आणखी पंचाईत.
              शिक्षण सुरू असताना कामाची फारशी सवय नाही.आणि त्यातून परदेशी मिळालेली संधी सोडायची नव्हती.त्यामुळे.मागचा पुढचा विचार न करता अस्मादिकांची स्वारी  विमानात स्वार होऊन निघाली.
    त्यात आई काकू यांनी दिलेले पदार्थ तीन दिवसात संपले. मग मात्र ब्रम्हांड आठवल. मेस मधे जाव तर सगळी कडे अंडी.मांस त्यामुळे पंचाईत होवू लागली. रूममेट तमिळी होती.ती म्हणू लागली.खा ग सगळ काही होत नाही. पण. पदार्थ घेण्यासाठी हात पुढे जाईनात. ही अवस्था तीन चार दिवसात झाली.
             मग ब्रेड बटरचा पर्याय निवडला.मनात अमूल बटरची इमेज होती म्हटले होईल नीट.पण समोर आल पांढरा शुभ्र पाणचट चवीच लोणी त्याने हा पर्यायही बाद झाला.नंतर बेक्ड पोटॅटोचा पर्याय आला. पण केवळ दोन तीन बटाटे खाऊन कस होणार.
           स्वैपाक करण्याची परवानगी मिळाली पण स्वयंपाक येत कोणाला होता.बाहेर दुकानातून आणायच तर जवळ पैसे सिमीत होते. खर्च भागवण कठीण होत.त्यावेळी काही मित्र मैत्रणींच्या सल्ल्याने एका लायब्ररीत शनिवार रविवारच काम मिळाल आणि सगळे प्रश्न सुटू लागले.
               पण गहन प्रश्न होता पोळी करायची  कशी.शेवटी  हिंमत करून जवळच्या इंडीयन स्टोअर्स मधून कणिक मीठ,बटाटे,लाल तिखट सगळ आणल आणि स्वयपाकाची जुजबी भांडी म्हणजे एक तवा,पोळपाट,कढई येवढ्यावर माझा संसार सुरू केला.कधी कणीक घट्ट झाली कधी सैल व्हायची  पोळी गोल होत नव्हती सगळ्या जगाचे नकाशे मी चितारू लागले. की मी जणू सगळ्या जगाच्या खाद्य संस्कृतीचा मिलाप करते आहे अशा थाटात  करत निदान पोटभरत होत. लेक्चर्स,स्वयंपाक नोकरी अभ्यास सगळी कसरत करत होते.हळू हळू सगळ जमायला लागल.
            एक दिवस. काहीतरी कामानिमित्त उशीरा आले पहाते तर पोळीचा डबा उघडा राहिला होता आणि पोळी म्हणजे वाळका तुकडा.अशा खूप गमती जमती करत मी नीट स्वैयंपाक शिकले.                 
             अभ्यासाचा ओघ वाढत होता स्वयंपाकात वेळ जात होता.आईचा फोन आला तिला अडचण सांगितली अगदी चुटकीसरशी मार्ग निघाला. आईन कणीक दुधात भिजवायला सांगितली आणि पोळ्या फ्रिज मधे ठेव नंतर फक्त गरम कर अस सांगितले.
             त्या बरोबर अस अन्न खावू नये म्हणूनही इशारा दिला.पण माझ काम सोप होत आहे म्हणून मी सोईस्कर रितीने त्या कडे काणा डोळा केला.  रविवारी संध्याकाळी पोळ्या करून फ्रीज मधे ठेवत असे आणि त्या आठवडाभर खात असे.
                पुढे पुढे पोळ्यांची जागा,परोठे,तिखट मिठाच्या पोळ्या अशा अनेक पदार्थानी घेतली.माझ्या मैत्रिणी माझ्या रूमवर येऊन पोळ्या मागत इतकी डिमांड आली.
           यात आईला फारच आनंद झाला होता.तिची लेक पोळ्या कारायला शिकली होती.आता लग्नाच्या नंतर तिला लेकीची काळजी नव्हती.
         त्या पहिल्यांदा काढलेल्या नकाशाने माझ शाकाहारीत्व आबाधित ठेवल होत.आणि माझी भूक ही भागवली होती.नाहीतर काय झाल असत कोण जाणे.
                     
तृप्ती लोणकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment