Saturday, July 28, 2018

पन्हे

विदर्भात सणांना नात्यांइतकच महत्त्व... प्रत्येक सणाचा थाट-सरंजाम वेगळाच..!!
अर्थात प्रत्येक च सणाला नागपूरला माझी हजेरी अवघडच होती, थोडे थोडे पदार्थ आताशा शिकलेय.

चैत्र पाडवा अन् अक्षयत्रितीया या दोन दिवशींचा अत्यंत महत्त्वाचा नैवेद्य च म्हणा कि " कैरी पन्हे" ,नं
पण पुण्याकडे होतं त्याहून फार वेगळं आणि "शाही"...
४६°से. चा पारा झेलण्यासाठी फक्कड उपाय.

कैरी पन्हे

साहित्य

कैरी, गूळ, साखर, मीठ,पानाचा विडा (अर्थात घरी २ पानांना चुना,कात, सुपारी, लवंग, वेलची लावून बांधलेला), चारोळी, काजू,बदाम पूड वेलचीपूड, भाजलेल्या जिरे ची पूड.
वाळा आणि गव्हूला कचूला (विदर्भात या नावाने वाळलेल्या पान न मुळयांचा वाटा मिळतो. शरीराला थंडावा देणारे.)

कृती

बाजरातून नवीन आणलेल्या छोट्याशा मातीच्या माठाला स्वच्छ धुवून, वाळा न गव्हूला कचूला आदल्या दिवशी रात्री पुरेशा पाण्यात भिजवून ठेवावा
* कैरी उकडून गर काढून घ्यावा, या गरात सव्वा पट समप्रमाणात विभागून गूळ-साखर मिक्स करावे. यात पाणी मिसळून किंचित मोठ्या आचेवर उकळण्यासाठी ठेवावे.
* आदल्या दिवशी भिजवलेले वाळा न गव्हूला कचूला मिक्सर मधून काढून घ्यावे, त्याच सोबत बनवलेला विडा देखील मिक्सर मधून बारीक करून घ्यावा.
* वरील दोन्ही गोष्टी पाणी टाकून व्यवस्थित गाळून घ्याव्या.
* हे पाणी ग्एस वरील पन्ह्यात हळूहळू मिक्स करावे.
* वेलचीपूड, जिरे पूड न मीठ घालावे.
* चारोळी न काजू बदाम पूड घालून चांगल्या ४-५ उकळ्या काढाव्यात.
* पन्हे थोडंसं दाट होत जातं.
* आच बंद करावी आणि पन्ह थंड होऊ द्यावे.
* थंड झाले की नवीन आणलेल्या माठात "मानचे पन्हे"ओतून ठेवावे.
* याचा देवाला आणि पूर्वजांना नैवेद्य दाखवतात.

महत्त्वाच म्हणजे हे पन्हे त्यादिवशी खाता येत नाही, दुसरया दिवशी खाता येत.आमरसासारख खातात याला जेवणात,ग्रहांच्या पिठाच्या पातळ पापङया, कुरडया आणि कणकेच्या गूळ टाकून केलेल्या पातळ न कडक तळलेल्या पुरया.

अहाहा... आठवूनच खाल्ल्याच समाधान मिळालं..😌😌.

जयश्री खराडे.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment