Monday, July 30, 2018

डोसा आणि चटणी

डोसा चटणी

१/२ वाटी नारळाचे तुकडे, १/२ वाटी फुटाण्याची डाळ, १ पाकळी लसूण, २ हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर.
  वरील सर्व साहित्य मिक्सर मधे एकत्र वाटावे. परत पाणी घालून वाटावे. नंतर एका भांड्यात काढून कसे दाट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून नंतर मीठ घालून चांगले एकत्र करावे. वरून तेल, मोहरी, हिंग, उडीद डाळ, कढीपत्ता आणि सुक्या मिरच्यांची फोडणी घालावी.

अस्मिता भस्मे
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

करवंदाची चटणी

एक वाटी कच्ची करवंदे,
दोन तीन हिरव्या मिरच्या,
अर्धा इंच आले,
चवीनुसार मीठ, साखर,
जिरे हे सर्व एकत्र वाटणे. आवडत असल्यास त्यावर फोडणी करून घालावी.

गीतांजली देगावकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

मिक्स पिठाचे डोसे

साहित्य

कणिक आणि ओट्स चे पीठ समप्रमाणात, तांदळाचे पीठ २ चमचे, कांदा, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, जिरे,आलं लसूण पेस्ट,अर्धी वाटी दही,तेल, मीठ
(आवडत असल्यास वेगवेगळ्या भाज्या घालून मिश्रण तयार करु शकतो)

कृती

सर्व पीठ एकत्र करून त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, जिरे,आलं लसूण पेस्ट, मीठ न चिमूटभर साखर मिसळून घ्यावी.
* दही न पाणी हळूहळू मिक्स करावे.
* गुठळी राहू न देता भजी च्या पीठापेक्षा किंचित पातळ पीठ भिजवावे.
* तवा तापला की जरा जाडसर च डोसे घालावेत.
* दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे.

सोबत काही द्यायची गरज नाही.. हेच चविष्ट लागतात.

जयश्री खराडे.

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment