वड्यासाठी पीठ बनवणे
साहित्य
जाडा तांदूळ १ किलो
चणा डाळ १०० ग्रॅम
उडीद डाळ ५० ग्रॅम
धणे १ टेबलस्पून
जीरे १ टेबलस्पून
बडीशेप १ टेबलस्पून
मेथी दाणे १/२ टीस्पून
कृती
तांदूळ स्वच्छ धुवा.
निथळून सुती कापडावर पसरऊन वाळउन घ्या. डाळी व इतर पदार्थ धुउन घ्यायची गरज नाही.
तांदूळ धुतल्यामुळे वडे मऊ व हलके होतात.
वरील सर्व पदार्थ एकत्र करून गिरणीतून भरड दळून आणावे.
पीठ हवाबंद डब्यात ठेवावे. खरतरं जेंव्हा वडे करायचे असतील तेंव्हाच पीठ दळून आणावे.
🔺साहित्य🔺
वड्याचे पीठ ३ कप
कांदा १ मोठा
हिरवी मिरची २ ते ३
कोथिंबीर मुठभर
आलं १/२ इंच
लसूण ५ ते ६ पाकळ्या
हळद १/२ टीस्पून
मीठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी आवश्यकतेनुसार
कृती
कांदा, मिरची, आल, लसूण, मिरची हे सगळ वाटून घ्या. काही लोकं आल- मिरची वै. वापरत नाहीत पण कांदा जरूर घालावा. कांद्यामुळे चांगली चव येतेच शिवाय पीठ आंबून येण्यास मदत होते.
एका परातीत वड्याचे पीठ, हळद, मीठ आणि गरम पाणी टाकून चपातीच्या कणकेप्रमाणे घट्ट मळून घ्या. (पीठ घट्टच मळायला हवे, आंबवल्यावर ते सैल होते.)
रात्रभर एका डब्यात उबदार जागेत झाकून ठेवा.
सकाळी पीठ फुगून येईल. छान मऊ झालेलं असेल.
पीठ खूपच मऊ होऊन वडे थापता येत नसतील तर थोडे सुके पीठ घालुन मळून घ्या.
कढईत तेल तापत ठेवून प्लास्टिकच्या पेपरवर वडे थापावे. (पुरीला घेतो तशी पिठाची गोळी घ्यावी), किंवा एक भिजलेला सुती कपड्याचा तुकडा पोळपाटावर पसरून लिंबाएवढ्या आकाराचे पीठाचे गोळे करून वडे थापून घ्या.
वडा एकदम पातळ किंवा एकदम जाड नको. वडा थापुन झाल्यावर त्या मधे एक भोक करुन घ्यावे.
तेल गरम करून मध्यम आचेवर वडे व्यवस्थित तळून घ्या.
गरम तेलात वडे बदामी रंगावर येईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळावेत
समिधा पाताडे
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment