Tuesday, July 24, 2018

मिश्र सांडगे

मिश्र सांडगे

साहित्य

1)अर्धा किलो अख्खे हरभरा
(हिरवे/लाल.अर्धे~अर्धे)

2)हिरव्या सालाची मुगडाळ,100gm

3)उडीद डाळ,100gm

4)लाल मिरच्या 4,5/शिवाय लालतिखट,

5)धने/जिरे/मेथी 100 gm,थोडे दही,

6)छोटा चमचा ओवा व बडीशेप,सुपारी एव्हढे आले,भरपूर कढीपत्ता

7)मीठ,किंचित जास्त,

कृती

सर्व डाळी व अख्खे हरभरे वेगवेगळे भिजत घालणे,

४/५ तासानंतर,जाडसर मिक्सर मधून फिरवणे,पाणी अजिबात नाही,दही घालणार आहोत आपण,

त्या मिश्रणात ,ओवा, बडीशेप,धने,जिरे,मेथी व कढीपत्ता भाजून ,पूड घालणे व आले किसून घालणे,दही मिसळणे मिश्रण
अगदी एकजीव करून,सांडगे घालण्या इतपत घट्ट झाले पाहिजे,
एक मोठ्या ताटाळ्यात,सांडगे घालून,कडक उन्हांत वाळवणे..

उपयोग,

--दुसऱ्या कुठल्या भाजीत घालायला,
--तळून खायला
--आमटीत घालायला
--कांदा घालून,ओलं खोबरं घालून भाजी करायला( फक्त सांडग्याचीच भाजी,रस्सा ठेवून )

वृषाली गोखले
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

१/२ किलो उडदाची डाळ, १/२ किलो मटकीची डाळ  ४ नं चाणळणीने दळायची आणि राञी त्याच्यामध्ये लसून पाकळ्या , लाल मिरची पावडर ,  हिंग , हळद , चवीनुसार मीठ हे सगळ मिश्रण मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्यावे . दळलेल्या पीठामध्ये पेस्ट घालून पीठ भिजवावे पीठ भिजवत असताना आवडत असल्यास कोथिंबीर चिरून टाकावी़ आणि राञभर भिजून दयावे. सकाळी उठून सांडगे तोडावे.

सौ. प्रिया कणसे.
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

तीन पावशेर मटकी डाळ, एक पावशेर हरभरा डाळ गिरणीतून भरडून आणायची. सकाळी लवकर  भरडलेल्या पिठात चवीप्रमाणे तिखट, मीठ, हळद, ठेचलेला लसूण, धनेजिरे पूड मिसळून पीठ घट्ट मळायचे . तेल लावलेल्या पाटावर हाताने सांडगे तोडायचे. कडकडीत ऊन्हात वाळवायचे. करतेवेळी तेलावर खमंग भाजून रश्शाची किंवा सुकी भाजी करायची.

मंगला डोंगरे

धन्यवाद

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment