बोकडाच्या पायाचे कालवण _(Paya Curry)_
लागणारे वेळ १.३० तास
साहित्य
६ बोकडाचे पाय (चांगले भाजून आणि साफ करून घेतलेले)
१ मोठा टोमॅटो (बारीक चिरलेला)
१ मोठा कांदा (बारीक चिरलेला)
१/२ कांदा (लांब चिरलेला)
१ इंच आल (ठेचलेले)
८ लसणाच्या पाकळ्या (ठेचलेल्या)
१ मोठी मिरची (बारीक चिरलेली)
५ तमालपत्र
८ लवंगा
२ दगडफुल
१ मोठा चमचा थोडे धने, जिरे आणि खसखस
४ मोठे चमचे तेल
१ छोटा चमचा हळद
३ छोटे चमचे लाल तिखट
चिमूटभर राई आणि जिरे
२ चमचे कुटलेला गरम मसाला
चवीपुरते मीठ
कृती
प्रथम साफ केलेले आणि तोडून आणलेले बोकडाचे पाय आख्खा मसाला (वर घेतलेली सामग्री) घालून पाण्यात उकडून घ्यावेत _(४ शिट्ट्यांनी मटण शिजणाऱ्या कुकर मध्ये १० शिट्ट्या घ्यावात)._
कढई मध्ये तेल गरम करून घ्यावे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा लालसर होई पर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये ठेचलेले आलं आणि लसूण घालून काही वेळ पुनः परतावे. नंतर चिरलेला टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परतावे. वरील मिश्रण थंड करून मिक्सर मध्ये त्याची पेस्ट करून घ्यावी.
कढईत थोडे तेल घालून त्यामध्ये चिमूट भर राई जिरे घालावे नंतर लांब चिरलेला कांदा घालून काही वेळ परतून घ्यावा. लाल तिखट आणि हळद घालावे. उकडून घेतलेले पाय त्या मिश्रणात थोडा वेळ परतावे. तयार केलेली पेस्ट, उरलेला पाया स्टॉक आणि चवीप्रमाणे मीठ घालून पूर्णपणे मिसळून घ्यावे आणि १० मिनिटे हलक्या फ्लेम वर शिजू द्यावे. कुटलेला गरम मसाला घालून ५ मिनिटे आणखी शिजवल्यावर झणझणीत पायाचे कालवण (Paya Curry) खाण्यासाठी तय्यार.
टीप
कालवणातील रस्सा आणि तिखटपणा आपल्या चवीनुसार ठेवू शकता.
वरील पाककृती माझा पहिला प्रयत होता काही चुका झाल्या असतील आणि सूचना असतील तर जरूर कळवा.
चेतन गावंड - पिरकोन (उरण)
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment