🔷काळ्या तव्यातील बांगडा🔷
काळा तवा म्हणजे लोखंडाचा तवा!!त्यात सुकी मच्छी चविष्ट होते.
१.बांगड्याचे छोटे 3 भाग करून पाण्यात भिजत ठेवा. अख्खा ही घ्यायचा असेल तर छोटे चीर द्या.
२.कांदा, टोमॅटो बारीक चिरून, कडीपत्ता,२ मोठ्या अख्ख्या हिरव्या मिरच्या मध्ये चीर दिलेल्या,२ पाकळ्या कोकम टाकून फोडणी द्या.
३. लसूण न सोलता फक्त ठेचा आणि आले वरून किसून टाका.
४. हे चांगलं मुरले की पाण्यात भिजत ठेवलेला बांगडा त्यात टाकून अंगाबरोबर पाणी ठेवून शिजवून घ्या. यात मीठ शेवटी किंचित घाला कारण सुकलेल्या बांगड्यात आधीच असते.
५.शेवटी कोथिंबीर घालून खायला घ्या.
मृणाल
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment