Thursday, November 15, 2018

बटाटा भरीत

बटाटा भरीत

आपण सर्वत्र सर्वदा वांग्याचे भरीत आवडीने खातो .ते करण्याचे प्रकार व पद्धती भिन्न असतात पण फावल्या निवांत वेळेत रुचिपालट म्हणून बटाट्याचे भरीतही खमंग व थोडे जहाज केले तर भारीच मज्जा येते चला मग जरा करण्याची पद्धत पाहू या !

★कोण किती खाणार हे विचारून घ्या तिखट की मध्यम ते ही विचारा उगीच कमी पडायला नको.
★मस्त गोल गरगरीत मध्यम आकाराची बटाटी मंद आचेवर गॅसवर सावकाश भाजून घ्या कारण सध्या चुली इतिहास जमा होत चालल्या आहेत .चुलीच्या राख वा कोळशाच्या हारात बटाटे भाजले तर चव चौपट वाढते .आता बटाट्याच्या पोटात चमचा ,चाकू,किंवा उलथणे टोचून पाहा सहज आरपार गेले तर बटाटे भाजले असे समजायला काहीच हरकत नाही .
★ बटाटे थंड होईपर्यंत एक काम करू या ! कांदा बारीक चिरून घेऊ. आता पाहा बर लाल तिखट हिरवी मिरची यापैकी जे उपलब्ध असेल व आवडेल ते चालेल .फोडणीचे साहित्य तर मसाला डब्यात आहेच.
★आता भाजलेले बटाटे शांत झाले असतील .मला थंड झाले असतील असेच म्हणायचे होते .बाहेरचे कव्हर काळे झालेले असेल पाहा तुम्हाला आवडते का पण मला मात्र फार आवडते .मी बटाटे कुस्करून घ्या .गाभ्याचा भाग किंचित कच्चा राहिला तरीही काही वाईट वाटून घेऊ नका.
★ तवा (म्हणजे तवाच नव्हे तेव्हा जे उपलब्ध असेल ते )गॅसवर ठेवा तापला की थोडे तेलौदार्य दाखवून चमचाभर जादाच टाका मग त्यात जिरे मोहरी कढीपत्ता व बारीक चिरलेला कांदा न करपू देता गाभुळा भाजून घ्या आता लाल तिखट किंवा टेचा यापैकी एकच हं ! सहन होईल असे तिखट टाका .परतण्याअगोदर मीठ टाका .कोथिंबीर असणारच मग तीही धुवून चिरून भरतावर टाका .सर्व मस्तपैकी एकत्र करून घ्या.
★ज्वारीची भाकरी आहे .बरं नसू द्या .आहो बाजरीच्या भाकरीबरोबर फारच छान लागते दोन घास जास्तच जातात.जाऊ द्या मग निदान चपाती तर आहे..
★चला आता कशाला उशीर .चवबदल रुचिपालट म्हणून करूनच पाहा बटाटा भरीत अस्सल गावरान!!

काकासाहेब वाळुंजकर

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

कडाकणी

कडाकणी

साहित्य:

•१ किलो पिठ्ठी
•१ वाटी रवा
•६०० ग्रॅम साखर
•४ मोठे तूप (मोहन)
•वेलचीपूड २ चमचे

तयारी:

•३ ते ४ तास रवा भिजत ठेवा.
•साखर भिजेल इतकं पाणी घेऊन साखर विरघळून घ्या.

कृती:

●१ किलो पिठ्ठीत प्रथम तुपाचे मोहन घालून मिक्स करून घ्या.
● नंतर त्यामध्ये भिजवलेला रवा मिक्स करा. वेलचीपूड घाला आणि मग विरघळलेले
●साखरेचे पाणी हळूहळू घालून चांगले मऊसूत मळून किमान १ ते २ तास मुरत ठेवा.

टीप: ◆कडाकणी करताना एक मोठी पारी लाटून त्यावर थोडं तूप पसरून पिठ्ठी भुरभुरावी आणि त्याची गुंडाळी करून गोळे कापून कडाकणी लाटावी. मस्तच होतात!!

वैशाली वेटाळे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

दूधाचे सार

दूधाचे सार

साहित्य:

•२ बटाटे
•१ कांदा
•१ चमचा धणे
•१ चमचा जिरे
•१बोटाचे पेर दालचिनी तुकडा
•४ लवंग
•धणे, जिरे,दालचिनी,लवंग हा मसाला वाटून त्याची बारीक पूड करावी.

कृती:

●तेलावर हिंग जिऱ्याची फोडणी करून त्यावर कांदा घालावा.
●हलका सोनेरी झाला की त्यावर बटाट्याच्या फोडी घालाव्या.
● परतवून तिखट हळद घालावी व थोडे पाणी घालून बटाटा शिजू द्यावा.
●मग वाटलेला मसाला घालावा व दूध अर्धा लिटर घालावे.सतत पळी फिरवत राहावी.
●वरून कोथिंबीर घालावी.
●मीठ ताटात बाजूला वाढावे.

ममता संसारे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

शेगलाच्या पाल्याची भाजी

शेगलाच्या पाल्याची भाजी

•शेगलाची पान चांगली खुडून घ्यावीत.
• स्वच्छ धुऊन घ्यावीत.
•फोडणीसाठी भरपूर प्रमाणात कांदा घ्यावा ३ किंवा ४कांदे, हिरव्या मिरच्या ५-६, लसूण आणि नेहमी वापरतो त्यापेक्षा थोडं जास्त प्रमाणात तेल, ओल्या नारळाचा किस आणि चवीप्रमाणे मीठ ( या भाजीत कांदा आणि तेल जास्त असेल तर भाजी खूप छान होते).
•फोडणीसाठी तेल कढईत टाकून त्यात लसूण, कांदा आणि मग हिरव्या मिरच्या घालाव्यात. •फोडणी चांगली परतून घ्यावी.
•त्यात चवीनुसार मीठ घालावं; मग स्वच्छ धुतलेली भाजी घालून चांगली परतून घ्यावी.
•भाजी शिजल्यावर त्यात ओल्या नारळाचा किस घालून पुन्हा एकदा भाजी परतून घ्यावी.
अशाप्रकारे शेगलाच्या पाल्याची भाजी तयार !!!

सुचिता सर्पे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान

#अन्नपूर्णा.

उपवासाचे पदार्थ

उपवासाची इडली-चटणी

साहित्य:

•२ पेले वरई
•१/२ पेला साबुदाणे
•चवीनुसार मीठ

कृती:

इडलीसाठी

•वरई व साबुदाणे ३-४ तास भिजत घालणे,
•सर्व मिश्रण नेहमीच्याच इडलीप्रमाणे वाटून घेणे. •रात्रभर किंवा ८-९ तास आंबवणे.
•नेहमीच्या इडली साच्याला तुपाचा हात लावून इडल्या वाफवून घेणे.

चटणीसाठी:

•अर्धा नारळाचा किसून चव,
•५-६ हिरव्या मिरच्या,
•मीठ चवीनुसार व चिमूटभर साखर हे सर्व मिश्रण वाटून घेणे.
•त्यावर जिरे-तूपाची फोडणी घालून व्यवस्थित एकत्र     करणे.
या, गरमागरम इडली चटणीचा आस्वाद घ्या...

दीपाली प्रसाद

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

=================================
  उपवासाचा ढोकळा

पाव वाटी साबुदाणा, पाऊण वाटी वरी तांदूळ
मिक्सरमधून काढून ताक किंवा दही टाकून एकत्र करून अर्धा तास झाकून ठेवले.
नंतर मिरची,मीठ व दाण्याचे कूट मिक्सरमधून काढून त्यात सोडा घालून वाफवले.
वरून तूप जिऱ्याची फोडणी घातली.
*उपासाला कोथिंबीर खात असाल तर घालू शकता.

98334 39044‬:
धन्यवाद!

#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

सलाड उत्सव

सलाड उत्सव

=================================

फळे आणि भाज्या यांचे सलाड

साहित्य व कृती:

१. कोबी आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. काकडी आणि गाजर साल काढून बारीक चिरून घ्या.
२. पालक, आईसबर्ग लेट्यूस, रोमन लेट्यूस (उपलब्ध असल्यास) हाताने तुकडे करून घ्या.
३. कांदा बारीक चिरून घ्या. (पातीचा कांदा असल्यास जास्त चांगले. थोडी पातसुद्धा चिरून घ्या.)
४. सफरचंदाची साल काढून चिरून घ्या.
५. वरील १ ते ४ एका मोठ्या बाउलमध्ये घ्या.
६. अननस चिरून बारीक तुकडे करा. संत्र्यांच्या फोडी करा. साले आणि बिया काढून टाका. डाळिंबाचे थोडे दाणे घ्या. हे सर्व बाऊलमध्ये टाका. त्यात शेंगदाण्याची जाड भरड टाका.

◆◆ड्रेसिंगसाठी

१. लिंबाचा रस
२. तिखट
३. मीठ
४. मिरपूड
५. धने आणि जिरे यांची पूड
६. साखर (आवडीनुसार)
७. तेल

★वरील १ ते ७ हे पदार्थ एकजीव होईपर्यंत ढवळा. ★हे ड्रेसिंग बाऊलमध्ये टाका आणि मिसळा. सलाड तयार.

●●●टीपा:
१. प्रमाण आपापल्या अंदाजानुसार..
२. द्राक्षे आणि अननस घेतल्यास ड्रेसिंगमध्ये साखर वापरली नाही तरी चालेल.
३. लेट्यूस उपलब्ध नसल्यास पालक जास्त प्रमाणात घ्या.
४. पालेभाज्या धुतल्यानंतर कोरड्या होणे आवश्यक आहे. सलाड स्पिनर वापरल्यास सहजपणे पाणी काढून टाकता येते. हे सलाड आमच्या (हा शब्द आदरार्थी नसून अनेकवचनी, भारतात असताना द्विवचनी आहे) अतिशय आवडीचे आहे.

वसंत काळपांडे

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

=================================

ड्रॅगन फ्रूट सलाड

साहित्य

•कांदा ,
•टोमॅटो,
•कोबी,
•ड्रॅगन फ्रूट,
•काकडी,
•डाळिंब
•एक चमचा तेल
•मोहरी
•एक चमचा लिंबू रस
•चिमूटभर काळी मिरी पावडर
•कोथिंबीर

कृती:

●सर्व जिन्नस बारीक चिरून घ्या.
●एक बाऊलमध्ये एकत्र मिक्स करा.
●नंतर त्यावर लिंबू रस आणि काळी मिरी पावडर घाला.
●एक चमचा तेल गरम करून त्यावर मोहरीची फोडणी करा.
●जस्ट फोडणी तडकली की वरील मिश्रणात ओतून थोडं मीठ व कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.

वैशाली वेटाळे

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा
=================================
चणा व मूग डाळीचे सलाड

साहित्य

•एक वाटी मूग डाळ
•एक वाटी चणा डाळ
•लिंबू रस •साखर
•मीठ
•कोथिंबीर
•कोबी
•टोमॅटो
•मेथीची पाने
•हिरवी मिरची

कृती

•प्रथम डाळी एक दोन तास भिजवून घ्या.
•मेथीची पाने थोडी चिरून घ्या.
•नंतर डाळी मधील सर्व पाणी निथळून घ्या.
•एका बाऊल मध्ये वरील सर्व जिन्नस एकत्र करून सर्व्ह करा.

वैशाली वेटाळे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या चकल्या

तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या चकल्या

साहित्य:

* १ किलो तांदळाचे पीठ.
* हिरव्या मिरच्या,अद्रक,थोडं लिंबू टाकून वाटण वाटून घेणं(तिखट वाटण)
* दही
* अमूल बटर
* दुधावरची मलई
* सफेद तीळ
* मीठ

कृती:

●तांदळाच्या पिठात १ वाटी दही,आवडी नुसार तिखट वाटण, अर्धा वाटी मलई, १वाटी अमूल बटर, आणि २ चमचा सफेद तीळ आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून,पाणी थोडं घालून छान पीठ मळून घायचे.
●आणि मग मळून झालेले पीठ चकली साच्यात घालून चकल्या पाडून मस्त तेलात तळायच्या.

कल्पना

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

फिरनी (तांदळाची खीर)

फिरनी (तांदळाची खीर)

साहित्य :

१ वाटी सुवासिक तांदूळ,
दूध,
तूप,
घरची साय,
अर्धी ते पाऊण वाटी साखर,
वेलची पूड,
२ लवंगा,
केशरकाड्या,
बदामकाप

कृती :
• तांदूळ धुऊन,निथळून घ्यावेत आणि थोडा वेळ कापडावर पसरून ठेवावेत.
• एक चमचा तुपावर थोडेसे भाजून घ्यावेत आणि दूध घालून मिक्सरवर रवाळ वाटावेत.
• भांङयात आधी २ चमचे तूप घालून मग हे वाटण घालावे शिजत आले की साखर घालून अजून रटरटू द्यावे.
• दूधात भिजलेल्या केशरकाड्या, वेलचीपूड,बदामकाप घालावेत.
• कोमटसर असताना छोट्या शॉट्स च्या ग्लासेसमधे भरावे वरून बदामकाप सजवावे आणि फ्रिजमधे थंड करण्यासाठी ठेवावे.
• साधीशी खीर छान रूपात सादर करूनही वाहवा मिळवावी.
ता.क. - माझ्या मैत्रिणीने हेच प्रकरण छोट्या बॉटलस् मधे सर्व्ह केले होते... मस्त वाटत होतं, माझ्याकडे हे होते..

जयश्री खराडे.

धन्यवाद

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

टोमॅटो सार

टोमॅटो सार

✴️साहित्य:

•टोमॅटो अर्धा किलो
•अर्धा नारळ चव
•२,३हिरव्या मिरच्या
•साखर पाव वाटी मीठ • आलं तुकडा
•२चमचे तांदूळ पीठ /कॉर्न पीठ
•२चमचे साजूक तूप
•१चमचा जिरे
• कडीपत्ता

✴️कृती :

●टोमॅटो धुवून उकडा.
● गार करून मिक्सरमधून काढा.
●नारळ, आलं, मिरची ,मीठ हे पण मिक्सर मधून काढा.
●टोमॅटो गर आणि सगळ मिक्स करा.
● ३ते ४ वाटी पाणी घाला आणि गाळून घ्या.
● मग पीठ लावा साखर घाला आणि उकळायला ठेवा, वरून तूप जिरे, कडिपत्त्याची फोडणी द्या.
● गरम गरम सार तयार!

अंजली अतुल जोशी

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

कुळीथ पिठाच्या वड्या

कुळीथ पिठाच्या वड्या

साहित्य:

•कुळीथ पीठ
•आलं लसूण मिरची पेस्ट
•लाल तिखट
•जिरे
•कोथिंबीर
•मीठ
•तेल
•गरम मसाला

कृती :

●कुळीथ पीठ किंचित भाजून घ्यावे.
●त्यात आलं-लसूण-मिरची पेस्ट,लाल तिखट,हळद,अगदी किंचित गरम मसाला,कांदा,जिरे,कोथिंबीर,मीठ ,तेल टाकून एकजीव करावे.गोळा होईल इतपत पाणी घेऊन चाळणीत तेल लावून थापावे.
●तुमच्याकडे इडली भांडे असेल तर त्यात वाफवून घ्यावे..(मी आळस केला आणि चाळणीत केले.कुकर ला वाफवले.. )
●१५ मिनिटांनी वड्या पाडाव्या आणि राईची फोडणी त्यावर घालावी.

◆◆या वड्या तशाच फोडणी न करता कांदा ,टोमॅटो, खोबऱ्याचं हिरवं वाटण करून -वाटणात टाकून सांबार बनवू शकतो!!

मृणाल पाटोळे

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

सिंधी साई भाजी

सिंधी साई भाजी

साहित्य:

•पालक, थोडी मेथी, थोडा शेपू, आंबट चुका (नसेल तर कैरी / लिंबू चालेल),
•भिजवलेली हरभऱ्याची डाळ,
•कांदा,
•टोमॅटो (गावठी टोमॅटो जो गोल असतो तो मिळाला तर उत्तम),
•लसूण,
•हिरवीमिरची,
•आले,
•कोथिंबीर,
•जिरे,
•तिखट,
•हळद,
•मीठ,
•तेल ,
•येथे थोडी कैरी किसून घातलीय.

कृती:

●प्रथम सगळ्या भाज्या धुवून बारीक चिरून घ्याव्यात. ●पॅन मध्ये तेलात जिरे फोडणीला घालून त्यात कांदा बारीक चिरून परतावा.
●मग टॉमेटो घालून परतावे.
●त्यापूर्वी हिरवी मिरची, कोथिंबीर, आले व लसूण कुटून  घ्यावे (मिक्सरमध्ये वाटू नये).
●हा मसाला कांद्यावर परतावा.
●फार वेळ परतू नये.
●मग सुके मसाले मीठ घालून एकदा परतावे. ●चिरलेल्या भाज्या आणि डाळ घालावी.
● 3-4 शिट्या काढाव्यात.
●वाफ गेल्यावर भाजी थोडी मॅश करावी.
●जरा सरसरीत ठेवावी.
●भात/पोळी/भाकरी बरोबर छान लागते.

रिमा मंकीकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

मडगणे

मडगणे

साहित्य:

•चणा डाळ,
•तांदूळ थोडेसे (दाटपणा येण्यासाठी),
•ओले खोबरे,
•गूळ,
•काजू,
•मनुका,
•वेलची पावडर

कृती:

●डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत ठेवावे.
●खोबरे वाटून त्याचा रस काढून घ्यावा.
●तांदूळ रवेदार वाटून घ्यावे.काजू भिजत ठेवावे.
●डाळ पाणी घालून शिजत ठेवावी.
●फार शिजवून बोळ करु नये.
● नंतर डाळीत वाटलेले तांदूळ घालून ढवळावे.
●थोडे पाणी (नारळ वाटून दाट रस गाळून वेगळा ठेवावा मग परत पाणी घालून मिक्सर मधून फिरवून परत गाळून रस काढ़ावा ते पातळ पाणी) घालून ढवळत राहावे म्हणजे गुठळया होणार नाहीत.
● शिजल्यावर त्यात काजू, गुळ, मनुका घालावे. चांगली उकळी आली की शेवटी नारळचा दाट रस आणि वेलची पावडर घालून उकळी आणून गॅस बंद करावा.
● मडगणे तयार.

★★हा खिरीचा प्रकार आहे. आम्ही याला पाईसम पण म्हणतो. बहुतेक समारंभात केले जाते. काही जण यात साबुदाणे पण घालतात. मी घालत नाही.

रीमा मंकीकर

धन्यवाद!

#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

अनारसे

अनारसे

साहित्य:

• १ कप तांदूळ
• १ कप किसलेला गूळ
• १ चमचा तूप
• खसखस
• तळण्यासाठी तूप / तेल

कृती:

● तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावेत. प्रत्येक दिवशी पाणी बदलावे.
● चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. पंच्यावर घालून कोरडे करून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे नंतर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावे.
● किसलेला गूळ आणि १ चमचा तूप चाळलेल्या बारीक तांदूळात घालून मळावे. घट्ट मळलेला गोळा ५-६ दिवस डब्यात भरून ठेवावा. स्टिलचा डबा वापरू नये शक्यतो प्लास्टिकचा डबा वापरावा किंवा प्लास्टिक पिशवीत भरून प्लास्टिकच्या हवाबंद डब्यात ठेवावे.
● ५-६ दिवसांनी हे पीठ बाहेर काढावे. तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल / तूप गरम करावे. २-३ सुपारीएवढे गोळे करावे. पुरीसारखे लाटावे. लाटताना खसखशीवर लाटावी. ही पुरी तळताना खसखस असलेला भाग वरती ठेवावा आणि तळताना पुरीची बाजू पलटू नये, नाहीतर खसखस जळू शकते.
● पुरी तेलात टाकल्यावर फुलते व थोडी पसरट होते त्यामुळे झारा आणि एक स्टीलचा चमचा तेलातील पुरीच्या कडेने धरावा म्हणजे पुरी तुटणार नाही व गोल राहिल.
●अनारसे तळताना ब‍र्‍याचदा तो फसफसतो. तेव्हा पिठाचा गोळा तसाच ठेवून द्यावा, नंतर वापरावा कारण हे पीठ ५-६ महिने सहज टिकते.
● अनारसे मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून काढावेत. चाळणीत उभे करून तेल निथळून जाऊ द्यावे.

सौ. वैशाली वेटाळे

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

शेंगदाण्याचा महाद्या

शेंगदाण्याचा महाद्या...

या पाककृतीत कोणतीही फळभाजी,शेंगभाजी किंवा फूलभाजी नाही. कदाचित म्हणूनच " महाद्या "या परोपकारी गंपूप्रमाणे सगळ्या लोकांना उपयोगी पडणारा ,अडचणीत मदतीला धावून येणा-या मुलाचं नाव या पाककृती ला पडलं असावं ,असा माझा तर्क आहे. कारण तो प्रकार असाच आहे.घरातभाजी नसताना करता येतो,डब्यात,सहलीलाही नेता येतो.चपाती ,भाकरी,भातासोबतही खाता येतो.शिवाय अबालवृद्ध सर्वांनाच आवडतो.

साहित्य :

•खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचं अर्धंबोबडं कूट ,
•बारीक चिरलेला भरपूर
•कांदा,
•टोमॅटो ,
•तिखट,
•मीठ,
•हळद ,
•थोडंसं तेल.

कृती :

●अगदी थोड्या तेलावर जिरं मोहरी आणि हिंगाची फोडणी करून कांदा टोमॅटो रंग बदलेपर्यंत परतून घ्यावे तिखट,हळद घालून थोडंसं पाणी घालावे .
●उकळी आल्यावर त्यात शेंगदाण्याचं अर्धंबोबडं कूट घालून चवीनुसार मीठ,गरम मसाला घालून झाकण ठेवावं.
●लगेचच शिजते शेंगदाण्याचं कूट.
●तेल,मीठ जपून वापरावं.कारण शेंगदाण्याचं तेल सुटतंच.
●या महाद्या चा घट्ट पातळपणा आपण ठरवू तसा... ●मी करताना नेहमी पिठल्याप्रमाणे अंगापुरतं पाणी घालून करते.पळीवाढं...काही जण पातळसरही करतात.
●नक्की करून पहा.

सविता कारंजकर

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

रताळ्याचे गुलाबजाम

रताळ्याचे गुलाबजाम

साहित्य:

•पाव किलो रताळे
•५० ग्राम खवा
•१०० ग्राम मैदा
•४ चमचे मिल्क पावडर
•अर्धा चमचा बेकिंग पावडर
•१०० ग्राम साखर पाकाकरिता
•चिमूटभर वेलचीपूड

कृती:

●प्रथम रताळे स्वच्छ धुवून उकडून घ्या.
●रताळे थंड झाल्यावर त्यामध्ये खवा, मिल्क पावडर, वेलचीपूड, बेकिंग पावडर,आणि जमवून घेईल तेवढा मैदा एकत्र करून घ्या.
● नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून छान तळून घ्या.
●गरम पाकात थंड झालेले गोळे मुरण्यासाठी ठेवून द्या. ●झाले गुलाबजाम तयार!!

वैशाली वेटाळे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

मसाला दूध -कोजागिरी स्पेशल

मसाला दूध

साहित्य:

•२ कप दूध
•३ टेस्पून साखर

मसाल्यासाठी  साहित्य :

•१/४ कप बदामाची पूड
•१ टेस्पून पिस्ता पूड
•१/२ टिस्पून वेलचीपूड
•चिमूटभर जायफळ पूड
•१ चिमूटभर केशर

कृती:
१) मसाला बनवताना न खारवलेले पिस्ता आणि बदाम वापरावेत. त्याची पूड करावी. बदाम पिस्ता पूड, वेलची आणि जायफळ पूड आणि केशर एकत्र मिक्सरवर एकत्र करून घ्यावेत.
२) २ कप दूध गरम करावे. त्यात ३ टेस्पून किंवा आवडीनुसार साखर घालावी. २-३ टीस्पून मसाला घालून ढवळावे.
३) थोडे उकळू द्यावे व गरम गरम सर्व्ह करावे.

टीप:

१) मसाला बनवताना इतरही सुका मेवा आवडीनुसार वापरू शकतो.
२) यामध्ये अख्ख्या चारोळ्याही घालू शकतो.
३) मसाल्यात जायफळ प्रमाणातच वापरावे. कारण मसाला दूधाला जायफळाचा जास्त फ्लेवर आला तर ते उग्र लागते.
४) केशर थोड्या दुधात भिजत घालून ठेवला ना छान रंग येतो.

सौ. वैशाली वेटाळे.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

पिकलेल्या केळ्यांचे आप्पे

पिकलेल्या केळीचे आप्पे

साहित्य:

•भाजलेला रवा,
•केळी (मी जास्त पिकलेली वेलची केळी वापरली), •गूळ,
•थोडे खोबरे,
•दूध,
•वेलची पावडर,
• चवीपुरते मीठ,
•तेल

कृती:

●रवा दुधात भिजत ठेवला.

● केळी गूळ घालून मिक्सर मध्ये फिरवून घेतली व रव्यात मिसळली.

● थोडे खोबरे,मीठ,वेलची पावडर,मीठ घालून चांगले मिक्स केले.

●आप्पे पात्रात थोडे तेल घालून हे मिश्रण मध्यम आचेवर झाकण लावून २ मिनिटं ठेवून परत परतवून १ मिनिट ठेवले.

रिमा मंकीकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

Wednesday, November 14, 2018

अंडा पराठा

मृणाल पाटोळे-अंडा पराठा

1.गव्हाच्या कणकेत तिखट,हळद,मीठ,तेल टाकून भिजवून घ्यावे. छोट्या छोट्या नेहमीच्या पोळ्या लाटून घ्याव्या.

2.एका मोठ्या बाऊल मध्ये अंडे फोडून त्यात मिरची,तिखट थोडे,कोथिंबीर,गरम मसाला,मीठ,हळद टाकून फेटून घ्यावे.

3.चपाती ची एक बाजू थोडीशी भाजून घ्यावी. तशी दुसऱ्या चपतीची ही..मग एका चपतीवर फेटलेले अंडे थोडे ओतून वरून दुसरी चपाती जी एक बाजूने शेकवून घेतली ती टाकून दाबावी!!उलटून पालटून दोन्ही बाजूने शिकवावी...छान फुगून येते..भरपूर तेल लावून खरपूस भाजावी...मधोमध कापून त्यावर चीज पेरून खायला घ्यावी!!

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

फोडणीचा भात

फोडणीचा भात 

भातात मसाला हळद मीठ घालून मिक्स करणे कढईत तेल गरम करून त्यात कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा टाकणे कांदा पारदश्रक झाल्यावर त्यावर भात घालून परतणे झाकण ठेवून एक वाफ काढणे नंतर  झाकण ऊघडून त्याच्यावर कोथिंबीर घालून परतते . मसाल्याच्या ऐवजी हिरवी मिरची घालून भात केला तरी छान लागतो

फोडणीचा भात प्रथम भात मोकळा करून त्यामध्ये तीखट मीठ हळद घालून एकत्र मीक्स करणे नंतर एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये कांदा टाकून चांगला गुलाबी होईपर्यंत परतून त्यामध्ये भात टाकून चांगला परतून पाच मीनीट झाकून ठवणे आवडत असल्यास खडा गरम मसाला टाकल्यास वास छान येतो हा शिळ्या भाताचा पण छान लागतो

वैशाली हेगिष्टे
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

फोडणीमध्ये लसूण हिरव्या मिरच्या घालून मस्त परतून घेणे त्यानंतर त्यावर शिजवलेला मोकळा भात मीठ घालून परतणे वरुन तळलेले शेंगादाणे आणि कोथिंबीर घालणे
@ अनघा भिडे

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

डॉ. संध्या झाडे

-कांदा न टाकता जीरे मोहरी आणि लसूण फोडणी दिल्या स छान लागतो,मी नेहमी तसा करते

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

ओवा भजी

ओवा भजी 

पानं   खुडून  धुऊन   घ्यावी  ...नेहमीचे   भजीचे  पीठ   भिजवून घेत असतो.तसे  म्हणजे .........हरभरा   बेसन  पीठ    एक   वाटी  चाळून   घेणे , एक  चमचा  बारीक   रवा   घ्या, नंतर  धणे --जिरे  पूड    व  लाल मिरची  पूड   किंवा  हिरव्या   मिरच्या   तुम्हाला   तिखट  जसे  आवडते   त्या   नुसार   घालावे,,मीठ   घालावे ,थोडी   बारीक  चिरून   कोथिंबीर   घ्यावी ,,आता  सर्व   एकत्र    करावे ..सोडा  मी टाकत     नाही ..

गरम  तेल  एक   चमचा   घालते  पानावर पीठ  चिकटेल (राहिले पाहिजे ) इतपत  पीठ  भिजवावे..म्हणजे   बटाटा भजी  किंवा  घोसाळा भजी  करतो .  तसे  पीठ   भिजवून   घ्यावे .......गरम  तेल   झाले   कि  तळून  घ्यावीत

सौ.  सुनंदा  शिंदे

धन्यवाद

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा