Wednesday, November 14, 2018


     माझ्या छोट्या मुलीला सोयाबीनची भाजी खूप आवडते. खूप दिवसात स्पेशल काही केले नव्हते म्हणून करायचे ठरवले.काल शनिवार...शनिवारी संध्याकाळी मी सुट्टी घेते.इतर दिवशी रात्रीचा स्वयंपाक ६.३०च्या आतच करून जाते. काल घरीच असल्याने थोडी टंगळमंगळ करत स्वयंपाकाला उशीर झाला. तोपर्यात माझी छोटी मुलगी झोपी गेली. इतर वेळी तिला जेवण्यासाठी झोपेतून उठवणे तसे कठीण... पण काल सोयाबीनची स्पेशल भाजी केलीय असे म्हटल्यावर पटकन उठली. तर सोये हुए को जगानेवाला असा हा सोया चंक्स मसाला😃.
    ग्रेव्हीची भाजी करताना दरवेळी माझे प्रयोग सुरू असतात.... यावेळी बनवलेली ग्रेव्ही चाबूक की काय म्हणतात ना, तशी झाली होती😃.
साहित्य :
        सोया चंक्स, कांदे २, टोमॅटो २, लसूण ५ पाकळ्या, १/२ इंच आले,१हिरवी मिरची, लाल सुकी मिरची, काळे मिरे ८, लवंग १, चक्रीफूलाची १ पाकळी, तमालपत्र पानाचा १इंच तुकडा,दालचिनी १/२ इंच, धणेपूड १/२ चमचा, जिरेपूड १/४ चमचा, लाल तिखट, १ १/२ चमचा, मगज बी चमचे, बदाम ३, काजू ५, वेलदोडा १,दही १चमचा, मीठ चवीनुसार. फोडणीसाठी ३ चमचे तेल, २चमचे तूप,१/२ चमचा जिरे.बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी.

कृती:

•एका भांड्यात पाणी गरम करून ५ मिनिटे सोयाचंक्स शिजवावेत.
• कढईमधे तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा मस्तपेैकी लालसर भाजून घ्यावा.
•थंड झाल्यावर त्यामध्ये बाकी सगळे साहित्य घालून मिक्सरमधे चांगले वाटून घ्यावे.
•एका कढईमधे तेल व तूप गरम करून त्यामध्ये जिरे टाकावे व वाटलेला मसाला तेल सुटेपर्यंत परतावा व शिजवलेले सोयाचंक्स आणि पाणी टाकून उकळी आणावी.
•वरून कोथिंबीर भुरभुरावी.
  
डॉ. अस्मिता भस्मे
धन्यवाद!!!

सोया खिमा

१.२०-२५ सोयाबीन चंक्स मीठ घातलेल्या गरम पाण्यात भिजवून १० मिनिटांनी पिळून पाणी काढून घ्यावे व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
२.कढईत तेल गरम करून बारीक चिरलेल्या २-३ मिरच्या, १ चमचा आलं लसूण पेस्ट,१ मोठा कांदा(बारीक चिरलेला),२ टोमॅटो(बारीक चिरलेला)हे सर्व परतून घ्यावे.
३.कुस्करलेले चंक्स व चवीनुसार मीठ घालून ५ मिनिटे शिजवून घ्यावे.
४. आता थोडीशी कोथिंबीर भुरभुरली की बस्स....
५.सोया खीमा तयार....😋😋😋

सानिका गावडे
धन्यवाद !!!

#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment