Wednesday, November 14, 2018

विड्याच्या पानांचे दूध कोल्ड्रिंक

साहित्य:

● १/२ लिटर दूध
● ३० ग्रॅमस् साखर
● २ चमचे कॉनफ्लॉवर,
( कॉन्फ्लॉवरच्याऐवजी मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर, कन्डेन्स्ड मिल्क ह्या पैकी काहीतरी एक वापरून बेस तयार करु शकता )
● १० ते १२ विड्याची ताजी हिरवीगार पानं
● २ चमचे कच्ची खायची शोप ( बडीशेप)
● १चमचा गुलकंद
●चिमूटभर हिरवा खायचा रंग

कृती:

◆ प्रथम दूधात साखर घालून उकळी आणावी
◆त्यामध्ये २ चमचे   मिल्क पावडर आणि १चमचा कन्डेन्स्ड मिल्क घालून एक उकळी काढून घ्यावी.
◆ हे दूध थोडं थंड झाल्यानंतर फ्रिजर मध्ये ६ ते ७ तास सेट होण्यासाठी ठेवावे.
◆ जेव्हा आपणास घ्यावयाचे आहे त्याअगोदर एक 10 ते 15 मिनिटे बाहेर ठेवावे.
◆ 10 ते 12 हिरवीगार खाऊची पाने, बडीशेप, गुलकंद मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.
◆ आत्ता हे दुधाच्या मिश्रणात घालून आणि थोडासा हिरवा रंग टाकून मिक्सरमधून किंवा ब्लेंडरने फिरवून घ्यावे.
◆ तयार झालेले दूध कोल्ड्रिंक फेसासहित ग्लास मध्ये ओतून त्यावर काजू बदाम, पिस्ता चे तुकडे टाकून सजवून सर्व्ह करावे.

सौ. वैशाली वेटाळे.
धन्यवाद!!

#अन्नपूर्णा
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान

No comments:

Post a Comment