लाल तिखट घालून सुकी बटाटा भजी
साहित्य:
बटाटा बारीक फोडी करून, कांदा बारीक चिरून, टाॅमेटो बारीक चिरून, तिखट, मिठ, कोथिंबीर, तेल आणि ओलं खोबरं
कृती:
१.भांड्यात तेल गरम करून, त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा मग टाॅमॅटो परतून घ्यावा.
२.लाल तिखट घालावं.
३.नंतर बारीक फोडी करुन घेतलेला बटाटा चांगलं परतवून बटाटा बुडेल एवढं पाणी आणि चवीपुरते मिठ टाकून भांडयावर झाकण ठेवून भाजी शिजवावी.
४.मध्ये, एक दोन वेळा भाजी परतवून घ्यावी..
५.बटाटा शिजल्यावर ओलं खोबरं आणि कोथिंबीर भुरभुरून झाकण ठेवून गॅस बंद करून पाच मिनिटं ठेवावी.
६.नंतर पानात वाढून घ्यावी.
७.वरण भाता बरोबर किंवा चपाती/ भाकरी बरोबर खावी.
संजय गावडे
धन्यवाद!!
#अन्नपूर्णा
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
No comments:
Post a Comment