चपाती नूडल्स
त्याचं झालं असं की सध्या काही ना काही कारणांनी रात्रीच्या चपात्या राहतायत..सहसा करून त्या चपात्या उन्हात वाळवून आम्ही गुरांसाठी गावाला पाठवून देतो...पण पावसाळ्यामुळे वाळवून ठेवणं शक्य नाही..मग आज मनात आलं की भारतीय चवीच्या नूडल्स करूयात.
साहित्य:
२ मोठ्या चपात्या..तवाभर असतात माझ्या...
१ उभा , पातळ (ज्यूलियन्स )कांदा, त्याच प्रकारे ढोबळी मिरची, गाजर, आणि अर्धी वाटी मका दाणे.( एवढंच होतं घरात सामान.)...
८-९पाकळया लसूण बारीक चिरुन..आलं थोडं किसून
( आज तर मी आलं-लसूण नव्हतं टाकलं तरी भुकेपोटी चांगलं लागलं.)
तुम्हाला हवं असेल तर फरसबी, मशरूम,पनीर असं घालून व नंतर त्यावर कांदा पात घालू शकता.भुरभुरवू शकता.
मसाले व सॉस-- इंडोचायनीज म्हणून जरा मॅगी मसाला व सोया सॉस.
इथे सुद्धा तुम्ही हवं तर जोडीला चिली सॉस वापरू शकता.
कृती:
•तेलामध्ये कांदा टाकून हलका ब्राऊनीश रंग आणायचा मग लसूण,आलं टाकायचं.
•मग सर्व भाज्या टाकून वाफेवर शिजवायचं .
•भाज्या शिजल्या की गॅस बंद करायचा.
•चपातीच पातळं लांबडे काप करायचे.
•आता शिजलेल्या भाजीत सोया सॉस टाकायचा.
•चपात्या टाकायच्या आणि मग छानपैकी हलवून गॅस चालू करून चपात्या गरम होईपर्यंत परतायच्या.
•मग वरूनच ५ रू वाला मॅगी मसाला टाकायचा.
•और फिर बस्स....कांदा पात होगी तो भुरभुरनेका और गरमा गरम खानेका....
रेणुका शिंदे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment