शेपूचे वडे
साहित्य
•चण्याची डाळ,
•शेपू आणि
•कांदा बारीक चिरलेला,
•लसूण,
•आले,
•हिरवी मिरची,
•जिरे,
•हळद,
•हवे असल्यास थोडे तिखट,
•मीठ
कृती:
●चण्याची डाळ थोडी वेळ भिजत ठेवावी.
●पाणी काढून मिक्सरमध्ये खडबडीत वाटावी.
●त्यातच आलं,लसूण,मिरची एक दोनदा फिरवावी.
●नंतर त्यात चिरलेला भरपूर शेपू आणि एक कांदा घालून मीठ,हळद जिरे घालून वडे हातावर थापून तळावेत.
●पुदिना चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.
★★टीप: मी डाळ जास्त वेळ भिजवत नाही. कांदा घातल्यावर पाणी सुटते ते पाणी डाळ शोषून करते. तेल जास्त लागत नाही आणि क्रिस्पी होतात.
रिमा मंकीकर
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment