Thursday, November 15, 2018

सलाड उत्सव

सलाड उत्सव

=================================

फळे आणि भाज्या यांचे सलाड

साहित्य व कृती:

१. कोबी आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. काकडी आणि गाजर साल काढून बारीक चिरून घ्या.
२. पालक, आईसबर्ग लेट्यूस, रोमन लेट्यूस (उपलब्ध असल्यास) हाताने तुकडे करून घ्या.
३. कांदा बारीक चिरून घ्या. (पातीचा कांदा असल्यास जास्त चांगले. थोडी पातसुद्धा चिरून घ्या.)
४. सफरचंदाची साल काढून चिरून घ्या.
५. वरील १ ते ४ एका मोठ्या बाउलमध्ये घ्या.
६. अननस चिरून बारीक तुकडे करा. संत्र्यांच्या फोडी करा. साले आणि बिया काढून टाका. डाळिंबाचे थोडे दाणे घ्या. हे सर्व बाऊलमध्ये टाका. त्यात शेंगदाण्याची जाड भरड टाका.

◆◆ड्रेसिंगसाठी

१. लिंबाचा रस
२. तिखट
३. मीठ
४. मिरपूड
५. धने आणि जिरे यांची पूड
६. साखर (आवडीनुसार)
७. तेल

★वरील १ ते ७ हे पदार्थ एकजीव होईपर्यंत ढवळा. ★हे ड्रेसिंग बाऊलमध्ये टाका आणि मिसळा. सलाड तयार.

●●●टीपा:
१. प्रमाण आपापल्या अंदाजानुसार..
२. द्राक्षे आणि अननस घेतल्यास ड्रेसिंगमध्ये साखर वापरली नाही तरी चालेल.
३. लेट्यूस उपलब्ध नसल्यास पालक जास्त प्रमाणात घ्या.
४. पालेभाज्या धुतल्यानंतर कोरड्या होणे आवश्यक आहे. सलाड स्पिनर वापरल्यास सहजपणे पाणी काढून टाकता येते. हे सलाड आमच्या (हा शब्द आदरार्थी नसून अनेकवचनी, भारतात असताना द्विवचनी आहे) अतिशय आवडीचे आहे.

वसंत काळपांडे

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

=================================

ड्रॅगन फ्रूट सलाड

साहित्य

•कांदा ,
•टोमॅटो,
•कोबी,
•ड्रॅगन फ्रूट,
•काकडी,
•डाळिंब
•एक चमचा तेल
•मोहरी
•एक चमचा लिंबू रस
•चिमूटभर काळी मिरी पावडर
•कोथिंबीर

कृती:

●सर्व जिन्नस बारीक चिरून घ्या.
●एक बाऊलमध्ये एकत्र मिक्स करा.
●नंतर त्यावर लिंबू रस आणि काळी मिरी पावडर घाला.
●एक चमचा तेल गरम करून त्यावर मोहरीची फोडणी करा.
●जस्ट फोडणी तडकली की वरील मिश्रणात ओतून थोडं मीठ व कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.

वैशाली वेटाळे

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा
=================================
चणा व मूग डाळीचे सलाड

साहित्य

•एक वाटी मूग डाळ
•एक वाटी चणा डाळ
•लिंबू रस •साखर
•मीठ
•कोथिंबीर
•कोबी
•टोमॅटो
•मेथीची पाने
•हिरवी मिरची

कृती

•प्रथम डाळी एक दोन तास भिजवून घ्या.
•मेथीची पाने थोडी चिरून घ्या.
•नंतर डाळी मधील सर्व पाणी निथळून घ्या.
•एका बाऊल मध्ये वरील सर्व जिन्नस एकत्र करून सर्व्ह करा.

वैशाली वेटाळे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment