पावधपाटे
घरात भाजणीचे पीठ. ते ते बाहेर काढले.
हिरव्या लवंगी मिरच्या
हळद
हिंग
वोवा पूड
मेथी दाणे
आमचूर पावडर
थोडे लाल तिखट
तीळदाणे
धनेपूड
मुक्त कोथिंबीर
बारीक चिरलेला कांदा
मीठ
पाव मिक्सरमध्ये बरीक केले .परातीत ती मखमल घेतली .त्यात भाजणीचे पीठ टाकले ( भाजणी ऐवजी बेसनपीठ घेतले तरी चालते )वर सांगितलेल्या सर्व जिन्नस प्रमाणात घेऊन पीठ एकजीव करून घेतले .हं पिठात चमचाभर तेलही टाकले .भारी दिसत होते .तिखट मिठाला कसे झाले ते चाखून बघितले .मी याबाबतीत प्रमाणाचा विचार नाही करीत अंदाजे सगळे बरोबर होते अगदीच तसे झाले .दहाएक मिनिटे त्याला बाजूला ठेवले व बाकीची तयारी केली .फडके, तेल पाणी तवा वर झाकण इ.आता तवा तापला होता पीठही मस्त भिजले होते . एक एक गोळा करून ओल्या फडक्यावर धपधपा धपाटे थापले पाचेक ठिकाणी तर्जनीने भोकसे पाडले व अलगद गोलगरगरीत धपाटे तव्यावर टाकून तेल फिरवून झाकले .आता गैस वाढवला कारण भूक ही वाढली होती मित्र ही काय घमघमाट सुटलाय म्हणून अधीर होत होता .भरभरा थापले .एवढ्यात माहेर टपकले .
अहो ,मला तिकडे सुगंध येत होता .काय केलय ,अय्या धपाटे !असं जवळजवळ मला धपाटा देत ती हात लावणार पण मित्राला पाहून जरा वरमली .
मी ओळख करून दिली व चिंच गुळाचं नारळकीस व आले खोबर्याची फोडणी दिलेलं घट्ट पाणी व दही साखर .बटर नव्हते अमूलचे वापरले .एवढ्यात कन्या व सुपुत्र आले छान झलेत कसे केले फारच टेस्टी म्हणत.फस्त झाले .मी मात्र वासात दंग .बाप ना !
खूप मस्त होतात .करून पाहा जे पाव नाकारतात ते पावाचे धपाटे निश्चितच स्वीकारतील .
काकासाहेब वाळुंजकर
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment