बांबू भाजी
साहित्य :
बांबू, भाजलेला कांदा, लसूण, आलं, खोबरे, लाल तिखट, गरम मसाला, हळद, मीठ, आंबोशी( सुकवलेली कैरी ), तेल ..
कृती:
◆प्रथम बांबू सोलून बारीक कापून घ्यावा. नंतर कढईत तेल घालून फ्राय करून घ्यावा.
◆मसाला:
कांदा, खोबरं, भाजून घेऊन आलं, लसूण हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन त्यात तिखट,गरम मसाला, हळद, घालून थोडे पाणी घालून चांगला बारीक वाटून घ्यावा.
◆कढईत तेल घालून त्यात मोहरी, जिरं घालून थोडे तडतडली की हिंग घालून त्यात वाटलेला मसाला घालून छान फ्राय करून घेऊन, त्यात आंबोशी घालून थोडे पाणी घालावे.
◆पाण्याला उकळी आली की त्यात फ्राय केलेली बांबूची भाजी घालावी आणि मीठ घालून २०-२५ मिनीटे शिजवून घ्यावे.
◆ही भाजी, भाकरी चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकता.
अभिलाषा अमोल शिंपी
धन्यवाद!!
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment