फ्रेश कलिंगड मोदक
साहित्य:
कलिंगड ज्यूस २५० ग्रॅम
साखर
खवा ५० ग्रॅ
खिसलेले खोबरे १०० ग्रॅ
मगज बी २-३ चमचे
कृती:
◆प्रथम कलिंगडाचा ज्यूस काढून घ्यावा. नंतर त्या मध्ये साखर घालून ज्यूस आटवावे. ◆आटलेला ज्यूस वेगळ्या बाउल मध्ये काढून घ्यावा.
◆आता कढई मध्ये खवा थोडा भाजून घेणे. ◆नंतर किसलेले खोबरे, आटवलेला कलिंगडाचा रस आणि खवा एकत्र करून पूर्ण एकजीव होई पर्यंत हलवावे.
◆त्यामध्ये मगज बी घालून मोदक साच्या मध्ये घालून मोदक तयार करावेत.
प्रज्ञा दोशी
तळेगाव दाभाडे
धन्यवाद!!
#अन्नपूर्णा
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
No comments:
Post a Comment